शालेय पोषण आहार कामगाराच्या प्रश्नासाठी आ. निकोले यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे शिष्टमंडळ शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना भेटणार – कॉ. डॉ. अशोक थोरात
बीड. ( प्रतिनिधी ) – राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, अनुदानित विनाअनुदानित संस्था व ऊर्दु शाळेमध्ये मध्यान्ह भोजन देणाऱ्या कामगारांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे, त्यासाठी माकप डहाणू विधानसभा आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे शिष्टमंडळ शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना भेटणार अशी माहिती महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार संघटना कामगार फेडरेशनचे राज्य सचिव कॉ. डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे.
यावेळी कॉ. थोरात म्हणाले की, राज्यातील जिल्हा परीषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, अनुदानित विनाअनुदानित व ऊर्दु शाळेमध्ये मध्यान्ह भोजन देणाऱ्या कामंगाराचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. केंद्र शासनाने २९ मे २०२१ रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेशजी पोखरियाल यांनी नुकतेच आपल्या टिटवीट द्वारे व प्रसारमाध्यमातुन मध्यान्ह भोजन योजनेच्या डायरेक्ट बेनिफीट ट्रान्सफर (DBT) चा आर्थिक लाभ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे जाहिर केले आहे. यामुळे सध्या कार्यरत असलेल्या राज्यातील विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत , दलित, ओबीसी अल्पसंख्यांक व गरीब घरातील गरजु महिला व पुरुष १ लाख ७५ हजार काम करतात. ह्या निर्णयामुळे त्यांचे काम जाणार आहे. ह्या निर्णयाचा फेरविचार व्हावा. व मुलाना शाळेतच ताजा पोषण आहार मिळावा यासाठी आमदार कॉ विनोद निकोले, राज्य अध्यक्ष कॉ प्रभाकर नागरगोजे, यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना भेटून, तामिळनाडु राज्याप्रमाणे शालेय पोषण आहार कामगाराना ११ हजार मानधन द्या , दि. २९ मे २१ च्या केंद्र शासन निर्णय रद्द करा, कोविड १९ च्या काळात शालेय पोषण आहार कामगांराना नियमित मानधन द्या. इत्यादी सह अनेक प्रलंबित मागण्या संदर्भात शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशन (सीटू) चे केंद्रीय कमिटी सदस्य कॉ. प्रा. ए. बी. पाटील, राज्य अध्यक्ष प्रभाकर नागरगोजे, राज्य सरचिटणीस कॉ. मधुकर मोकळे, राज्य सचिव कॉ. डॉ. अशोक थोरात, कॉ. कल्पना शिंदे, कॉ. मंगल ठोंबरे, मिरा शिंदे, कुसुमताई देशमुख, मन्सुरभाई कोतवाल, आमोल नाईक, अनिल मिसाळ, यशंवत सरवदे, शंकर कराळे, कॉ. पंजाबराव गायकवाड, कॉ. सुभाष पांडे इत्यादी सह अनेक राज्य कमिटी सदस्य या शिष्टमंडळात राहाणार आहेत. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शालेय पोषण आहार संघटना कामगार फेडरेशनचे राज्य सचिव कॉ. डॉ. अशोक थोरात यांनी माहिती दिली आहे.