आपला जिल्हामहाराष्ट्रराजकीय
स्व. गणपतराव देशमुख यांना कॅबिनेटने वाहिली श्रद्धांजली.
मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – दि. ३० जुलै २०२१ रोजी स्व. गणपतराव देशमुख यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. त्या अनुषंगाने माजी मंत्री, भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. भाई गणपतराव देशमुख यांना दि. ०३ ऑगस्ट २०२१ रोजीच्या सह्याद्री अतिथिगृह येथे राज्य मंत्रिमंडळाने बैठकीच्या प्रारंभीच श्रद्धांजली वाहिली. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी शोक प्रस्तावाचे वाचन केले. यावेळी सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून त्यांना विनम्र श्रद्धांजली वाहिली.