महाराष्ट्र

विधवा महिलेला मुलासोबत स्वीकारून केला विवाह ; समाजसेवक किशोर झेंडेकर यांचे युवकांपुढे आदर्श

# सोशल मीडियावर कौतुकांचा वर्षाव..!

सोलापूर. (प्रतिनिधी) – विधवा महिलेला मुलासोबत स्वीकारून विवाह करणाऱ्या समाजसेवक किशोर झेंडेकर या युवकाने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. लग्न झाल्यावर पती गमावलेल्या युवती सोबत त्याने संसार थाटून परंपरेच्या पलीकडे असणारा आनंदाचा काठ जोडीने गाठला आहे. विशेष म्हणजे दोन्ही कुटुंब आणि मित्र परिवाराने त्यांना भरभरून मदत केली असून सोशल मीडियावर जोरदार कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सोलापुरात राहणाऱ्या रूपाली मदूर या 24 वर्षीय युवतीचे सन 2017 मध्ये आपल्या मामासोबत लग्न झाले. त्यांचा आनंदात संसार सुरू होता. मात्र, काळाने घात केला, तिच्या पतीचे एका घटनेत निधन झाले. त्यानंतर पदरी असणारे बाळ घेऊन ती आपल्या माहेरी राहू लागली. शिक्षण झाले होते. खासगी नोकरी करत ती आपले उदरनिर्वाह करत होती. त्याच वेळी किशोरला ही सगळी हकीकत समजली. नात्यात असल्याने आधीपासून एकमेकांची चांगली ओळख होती. किशोर हा मुळात चळवळीतला कार्यकर्ता. त्याने पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक म्हणून खेडोपाडी जाऊन काम केले आणि ते आजही सुरू आहे. त्याच्या मनात रूपालीविषयी काळजी निर्माण झाली. त्याने आपल्या आईला ही काळजी बोलून दाखवली अन् आई अनिताने रीतसर मागणी घालून रूपालीबद्दल घरच्यांना विचारले. लग्नात रूपालीचा मुलगा श्रेयस याला जवळ बसवून लग्न सोहळा पार पडला. पाहणाऱ्या सगळ्यांनी या दोघांचे कौतुक केले.

अन् पुन्हा सगळं सावरलं.
अर्ध्यावरती डाव मोडला होता. पण भूतकाळ अन् वर्तमान काळ व गुणदोषांसह स्वीकारणाऱ्या जोडीदाराची साथ मिळाली. याचा मला प्रचंड आनंद झाला आहे. ” – (वधू) रूपाली झेंडेकर.

आनंद मागून मिळत नाही, तो दिल्याने वाढतो.
आपल्याला सगळे काही मिळायला हवे, ही अपेक्षा ठेवण खरं तर चुकीचे. सगळे मिळवायला हवे, ते मिळत असताना इतरांना आनंद देता यायला हवा ही प्रामाणिक इच्छा माझी नेहमीच असते. त्या विचारातूनच मी हा विवाह केला आहे. श्रेयसला बाबाचे प्रेम देत येईल, याचे समाधान आहे. – (वर) किशोर झेंडेकर.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे