राजकीय

सांगोल्यात शिवसेनेला जबरदस्त खिंडार ; मातोश्री व मिलिंद नार्वेकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

# शिवसेनेचे नेते मा. सरपंच विजय शिंदे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शेकाप मध्ये जाहीर प्रवेश

सांगोला. (विशेष प्रतिनिधी) भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाईजयंत पाटील यांच्या उपस्थितीत सांगोला येथे शेकडो शिवसैनिकांनी शेकाप मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे आता मातोश्री व शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिलिंद नार्वेकर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सावली म्हणूनच शिवसेनेत ओळखले जातात. राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या पक्ष प्रवेश मुळे शिवसेनेची गळती होते आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होत असून याला जबाबदार कोण ? अशी चर्चा शिवसेना वर्तुळात जोरदार रंगली आहे. तर दुसरी कडे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार डॉ. भाईगणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांना पराभूत करून राष्ट्रवादीचे नेते दीपकआबा साळुंखे पाटील यांनी छुप्या पद्धतीने पाठिंबा दिल्यामुळे सांगोला विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील निवडणून आले आहेत. अशी तालुक्यात चर्चा कायम असते. असे असताना शिवसेनेला पडलेली खिंडार ही सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

यावेळी बोलताना आमदार जयंत पाटील म्हणाले, कार्यकर्ते हेच शेकाप पक्षाची खरी ताकद आहे. माझे कार्यकर्ते ही माझी ताकत आहे. ते तुम्ही या ग्रामपंचायतीमध्ये दाखवून दिले आहे. आबासाहेबांची प्रकृती बरी नसतानाही ज्या जिद्दीने तुम्ही ग्रामपंचायत निवडून आणल्या त्याबद्दल सरपंच -उपसरपंच यांचे आभार मानले. येणाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्वबळावर निवडून ज्यांनी आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फसवल आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला असला तरी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये 52 ग्रामपंचायती स्वबाळावर लढवून लाल झेंडा फडकवला त्याबद्दल सर्व सरपंचांचे व कार्यकर्त्यांचे यावेळी त्यांनी कौतुक केले. आबासाहेबांनी इथल्या प्रत्येक गोरगरीब जनतेच्या हितासाठी काम केले असून, त्यांच्यावर अतोनात प्रेम केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये विजय हा आपलाच होणार असल्याचे सांगत, पुढे म्हणाले की आबासाहेब तुमच्या समोर सांगोल्याची आमदारकी परत मिळवू असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

डॉ. गणपतराव देशमुख यांचे वय 94 वर्षे झाले तरी आजही ते पुरोगामी युवक संघटना यांच्या सह आपले नातू डॉ. बाबासाहेब देशमुख व डॉ. अनिकेत देशमुख व शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तालुक्यात राजकीय सक्रिय आहेत अशी भावना सर्वत्र वर्तवली जात आहे. तर दुसरी कडे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे गावागावात जाऊन लोकांशी जनसंपर्क वाढवत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहेत की, आपण कोणत्या पक्षात जावं आणि कोणत्या पक्षात जाऊ नये. असे असताना देखील ” टायगर अभी जिंदा है ” अशा स्वरूपात गणपतराव देशमुख यांच्याबद्दल नागरिकांनी भर सभेत जोरदार घोषणाबाजी केली.

याप्रसंगी विजय शिंदे यांच्या सह 27 बड्या नेत्यांनी शेकाप मध्ये प्रवेश केला. यावेळी सुप्रियाताई पाटील, भाई अनिकेत देशमुख, भाई सचिन देशमुख, भाई चंद्रकांत देशमुख, भाई बाबासाहेब कारंडे, भाई नानासाहेब लिगाडे, भाई विजय शिंदे, भाई राहुल पोकळे, भाई राजेंद्र कोरडे, भाई प्रा. एस व्ही जाधव, भाई बाळासाहेब एरंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे