ब्रेकिंग

कोविड – 19 मृतदेहासाठी रद्द करण्यात आलेल्या पोलिसांच्या NOC चा अजब अट्टहास का ? – अनिल गलगली

परिपत्रकाचे अंमलबजावणी न करण्याऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी

मुंबई. ( प्रतिनिधी ) – कोविड 19 मृतदेहाची विल्हेवाट लावताना पोलिसांच्या ना हरकत प्रमाणपत्राची मागणी न करण्याच्या परिपत्रकाला रुग्णालय प्रमुख जुमानत नाहीत. कोविडचे मृतदेह नातेवाईकांना सुपुर्द करण्यासाठी रद्दबातल करण्यात आलेल्या पोलिसांच्या ना हरकत दाखला (NOC) चा अजब अट्टहास सुरु आहे. याबाबत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त यांसकडे लेखी तक्रार केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त यांसकडे पाठविलेल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे की, 3 ऑगस्ट 2020 रोजी डॉ. मंगला गोमारे यांनी अतिरिक्त आयुक्त यांच्या परवानगीने कोविड – 19 मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेताना पोलिसांच्या ना हरकत प्रमाणपत्राची मागणी न करण्याबाबत परिपत्रक जारी केले. यापूर्वी पोलिसांच्या ना हरकत प्रमाणपत्र शिवाय मृतदेह दिला जात नसे, या प्रकाराने मृतदेह रुग्णालयातून स्मशानभूमीमध्ये नेण्यास वेळ लागत असे. सार्वजनिक आरोग्य खात्याचे परिपत्रक स्वयंस्पष्ट असताना बीकेसी, सायन आणि टाटा रुग्णालयात पोलिसांच्या ना हरकत प्रमाणपत्राचा अट्टहास केला जात असल्याचा आरोप अनिल गलगली यांनी केला आहे. बुधवारी, 2 ऑगस्ट रोजी जोगेश्वरी येथील उबादुल्ला या 65 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकांचे निधन कोविडमुळे सायन रुग्णालयात झाले पण त्यांचा मृतदेह त्यांचा मुलगा मुसव्वीर यांस दिला जात नव्हता. पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र मागितले जात होते. कोविडमुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेणारे इकबाल ममदानी यांनी अनिल गलगली यांस होणाऱ्या अडवणुकीची माहिती दिली. गलगली यांनी पालिका उपायुक्त देवीदास क्षीरसागर यांस घटनेची माहिती दिली असता त्यांनी सायन रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मोहन जोशी यांस सूचना जारी केल्या आणि त्यांनतर पोलिसांच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय मृतदेह त्यांचा मुलगा मुसव्वीर यास देण्यात आला.

अनिल गलगली यांनी त्या सर्व अधिकारी वर्गाची चौकशी करण्याची मागणी केली आहे जे पालिकेच्या परिपत्रकाला न जुमानता मृत्यूनंतर व्यक्तीच्या नातेवाईकांना क्षणोक्षणी त्रास देत आहे. परिपत्रक पालिकेचे असताना त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकारी वर्गावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे