ब्राह्मण पुरोहित आणि कीर्तनकारांना एक हात मदतीचा ह्या उपक्रमाने कर्तव्यपूर्तीचे समाधान – संदीप खर्डेकर
मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – क्रिएटिव्ह फाऊंडेशन आणि मुकुल माधव फाऊंडेशनच्या वतीने ब्राह्मण किर्तनकार आणि पौरोहित्य करणाऱ्यांना एक हात मदतीचा अंतर्गत शिधा वाटप करण्यात आले या उपक्रमाने कर्तव्यपूर्तीचे समाधान झाल्याचे मत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी खर्डेकर म्हणाले की, ब्राह्मण पुरोहित आणि किर्तनकार यांना एक हात मदतीचा देताना कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळत असून यातून समाजाप्रतीची कृतज्ञता व्यक्त करता आली. ग्रामीण भागातील ब्राह्मण समाजाची अवस्था वाईट आहे. चांदा ते बांदा राज्यभर प्रवास करताना मराठवाड्यासह सर्वत्र ब्राह्मण समाजाची अवस्था बघितली आणि मराठा समाजाप्रमाणे ब्राह्मण समाजालाही आधाराची गरज असल्याचे लक्षात आले असे संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले. या कार्यात मुकुल माधव फाउंडेशन चा मोलाचा वाटा असल्याची खर्डेकर म्हणाले. परशुराम सेवा संघाचे विश्वजित देशपांडे यांनी ब्राह्मण आर्थिक विकास महामंडळ स्थापनेसाठीच्या लढ्याची माहिती देताना शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमावेळी प्रसिद्ध किर्तनकार जयश्री देशपांडे यांनी किर्तनकारांच्या व्यथा मांडल्या. त्या म्हणाल्या की, शासनाने किर्तनकारांची बाजू समजून घेऊन त्यांनाही मदत करावी अशी आग्रही मागणी आम्ही राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यांकडे केली. त्यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले आहे.
या कार्यक्रमाला क्रिएटिव्ह फाउंडेशनचे संस्थापक आणि पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेविका आणि शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, कोथरूड मंडल युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षदा फरांदे, याज्ञवल्क आश्रमाचे मोहनराव मुंगळे, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे प्रमोदराव शेजवलकर, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक / पुणे केंद्रचे विश्वनाथ भालेराव महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे अतुल व्यास, परशुराम सेवा संघाचे विश्वजित देशपांडे, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे डॉ. अरुण हुपरीकर, ब्राह्मण जागृती सेवा संघाच्या ऍड.ईशानी जोशी, आम्ही सारे ब्राह्मणचे भालचंद्र कुलकर्णी, ब्राह्मण महासंघाचे
मनोज तारे, मदनजी सिन्नरकर, मयुरेश अरगडे ( विप्र संघ ), हर्षद जोगळेकर (कीर्तनकार), सुशील नगरकर (गहुंजे ब्राह्मण संघ), सतीश कुलकर्णी (देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ) यांच्या सह भाजपाच्या पल्लवीताई गाडगीळ, सुप्रियाताई माझीरे, संगीताताई आदवडे, सौमित्र देशमूख, क्रीएटिव्ह फाउंडेशन चे विश्वस्त प्रतीक खर्डेकर, कल्याणी खर्डेकर वा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केले तर विश्वजित देशपांडे यांनी आभार मानले.