ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कडे साकडे
नारायण राणे यांची देखील घेतली भेट !
मुंबई. (प्रतिनिधी) – ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कडे साकडे घालण्यात आले आहे.
यावेळी ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या घेवून शिष्टमंडळाने महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ब्राह्मण समाजा च्या प्रमुख मागण्यांवर साधक बाधक चर्चा करून फडणवीस यांनी शिष्टमंडळाला मार्गदर्शक सूचना दिल्या. याप्रसंगी भाजपा प्रवक्ते केशव उपाध्याय उपस्थित होते. पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, बीड, परभणी, लातूर जिल्ह्यातून परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे, समस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा. मनोज कुलकर्णी, प्रा. संजीवनी पांडे, मकरंद कुलकर्णी, निखिल लातूरकर, गजानन जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच सदरहू मागण्यांबाबत नारायण राणे यांची देखील प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे.
