आपला जिल्हा

कोरोना आटोक्यात येत असला तरी नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे – वि.प. प्रविण दरेकर

मुंबई. ( प्रतिनिधी ) – राज्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे यासाठी नियमांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याची गरज आहे. लसीकरण जेवढे जास्त होईल, तेवढे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांना बळ मिळेल, असे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितले. पश्चिम उपनगरातील कोरोना लसीकरण केंद्राचा आढावा दरेकर यांनी घेतला. तसेच यावेळी सध्याची कोरोनाची परिस्थिती त्यांनी जाणून घेतली.

सध्या लसीकरण केंद्रात होत असलेल्या एकूण चाचण्यांचे प्रमाण, रुग्ण बाधित येण्याचे प्रमाण, जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्राची संख्या, तेथील नागरिकांच्या चाचण्या आणि सर्वेक्षण आदींबाबत सविस्तर माहिती डॉक्टर, परिचालीका, वॉर्ड बॉय, नर्सेस आणि इतर कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी दरेकर म्हणाले, कोरोनाचा आटोक्यात येत असून पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी अधिकाधिक संख्येने कोरोना चाचण्या करण्याची गरज असून त्यादृष्टीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साठत असल्यामुळे कोविड सेंटर येथे रुग्णांचे हाल होत असून लसीकरण मोहीम सुद्धा ठप्प होत आहे, त्यामुळे यंत्रणा सक्षम करत जास्तीत जास्त लसीकरण कसे करता येईल यावर लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले. दरेकर यांनी आज वेल्फेअर सेंटर, केतकीपाडा, दहिसर वॉर्ड क्र. ०३ येथील कोविड लसीकरण केंद्राची पाहणी केली असून माँ साहेब मीनाताई ठाकरे मंडई, रावळपाडा येथील वॉर्ड क्र. ०४, मुरबालीदेवी जलतरण तलाव शुक्ला, कम्पाऊंड दहिसर येथील वॉर्ड क्र. ०५ तर सिविक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अँड रीसर्च सेंटर, बोरिवली वॉर्ड क्र. ११ येथील लसीकरण केंद्राची पाहणी केली. तसेच एस. एन. एक्सप्लोड जिम, कुलूपवाडी, बोरिवली येथील वॉर्ड क्र. १२ आकुर्ली प्रसुतीगृह, महालक्ष्मी उधान जवळील बोरिवली तसेच वॉर्ड क्र. २५ येथील लसीकरण केंद्राची पाहणी दरेकर यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे