महाराष्ट्र

पावसाळी अधिवेशन : जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे सोशल मिडीया आंदोलन होणार – वितेश खांडेकर

मुंबई. (प्रतिनिधी) – दि. 31 ऑक्टोबर 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने मागील पाच वर्षांपासून विविध आंदोलने करून मागणी केली मात्र शासनाने फक्त आश्वासने देऊन वेळोवेळी कर्मचाऱ्यांची फसणूक केली आहे. नवीन पेन्शन योजना (NPS) राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर लागू केली मात्र नुकतेच केंद्र सरकाने दि. 30 मार्च 2021 ला राजपत्र काढून आपल्या NPS धारक कर्मचाऱ्यांना मृत्यू नंतर जुनी कुटुंब निवृत्ती वेतन योजना आणि सर्व कर्मचाऱ्यांना मृत्यूनीसेवा उपदान देण्याचे निश्चित धोरण अवलंबि आहे मात्र याबाबत महाराष्ट्र शासनाणे पूर्णतः दुर्लक्ष करून आपल्या राज्यातील मृत DCPS/NPS धारक कर्मचाऱ्यांच्या परिवारावर उपासमारीची पाळी आणून पेन्शन या शब्दाला काळिमा फासली आहे. शासनाच्या या धोरणाविरुद्ध कर्मचाऱ्यामध्ये प्रचंड रोष असल्यामुळे येत्या दि. 05 व 06 जुलै च्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दिवशी सर्व कर्मचारी ट्विटर आणि ई – मेल च्या माध्यमातून विधिमंडळावर सोशल मिडियाद्वारा आंदोलन करणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांनी दिली आहे.

संघटनेद्वारा दि. 05 जुलै 2021 ला संघटनेची मंत्रालय टीम मुख्यमंत्री, वित्तमंत्री तसेच अन्य मंत्र्यांना मुंबई येथे विधिमंडळात गाठून त्यांना निवेदन देऊन चर्चा करणार आहेत तर त्याच वेळी राज्यातील 10 लाखाहून अधिक कर्मचारी ट्विटर वर #उद्धवजी जुनी पेन्शन_लागू करा व #Justice4MH_Dead_NPSEmployees या Hashtag द्वारा जुनी पेन्शनची मागणी आक्रमकपणे सरकारकडे मांडणार आहेत. त्यानंतर दि. 06 जुलै 2021 ला राज्यातील 05 लाखाहून अधिक कर्मचारी शालेय शिक्षण मंत्री व शालेय शिक्षण राज्यमंत्री तसेच संबंधित विभागाचे अधिकारी यांना ई – मेल करून शालेय शिक्षण विभागाच्या DCPS आणि NPS च्या अनागोंदी कारभाराची आणि त्यातून सदर योजनेतून होत असलेल्या कर्मचारी पिळवणूकीची आपबिती व्यक्त करून न्यायाची विनंती करणार आहेत. त्याचवेळी संघटनेची मंत्रालय टीम सबंधित मंत्री व अधिकारी महोदयांना मुंबई येथे विधिमंडळात गाठून त्यांना निवेदन देऊन चर्चा करणार आहेत. त्यासोबतच दि. 02 जुलै पासून राज्यातील मृत DCPS / NPS धारक कुटुंबाचे परिवार आणि संघटनेचे पदाधिकारी विधीमंडळाच्या सर्व 288 आमदारांना त्यांच्या स्वगृही भेट घेऊन मृत कर्मचाऱ्यांच्या परिवाराला कोणतीही पेन्शन न मिळाल्यामुळे होत असलेल्या हाल अपेष्टाची माहिती देऊन न्यायाची मागणी करणार आहेत. त्यासाठी राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्य सचिव गोविंद उगले, राज्य कार्याध्यक्ष प्राजक्त झावरे, आशुतोष चौधरी, राज्य कोषाध्यक्ष प्रवीण बडे, राज्य सल्लागार सुनील दुधे आदी आंदोलन नियोजन टीमने केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे