राजकीय

कोरोना लसीकरण मोहिमेत केंद्राच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आल्याने आरोग्य मंत्र्यांना जावे लागले – महेश तपासे

राज्याला ३ कोटी लस उपलब्ध करण्याची मागणी करूनही लस पुरवठा उपलब्ध होत नाही !

मुंबई. (प्रतिनिधी) कोरोना लसीकरण मोहिमेत केंद्राच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार सातत्याने समोर आल्याने केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा आणि नवीन आरोग्यमंत्री नेमण्यामागे कारण होते असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. प्रतिदिवस १५ लाख लसीकरण करण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे असा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनात व्यक्त केला होता. मात्र केंद्राकडून लस उपलब्ध झाल्यावरच हे शक्य होऊ शकेल, असेही महेश तपासे म्हणाले. आज राज्यातील अनेक महापालिकांमध्ये गेल्या आठ दिवसापासून लससाठा उपलब्ध नाही. याला केवळ केंद्रातील भाजपसरकार जबाबदार आहे, असा आरोपही महेश तपासे यांनी केला. राज्यसरकारने अधिवेशनादरम्यान केंद्राकडे दरमहा तीन कोटी लस उपलब्ध करण्याची मागणी करूनही लस पुरवठा उपलब्ध होत नाही अशी खंतही महेश तपासे यांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे