आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

SN कॉलेज च्या गौतम सुतार चा रांगोळी च्या विक्रमाचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये समावेश.

महाविद्यालयातर्फे कौतुक !

भाईंदर. (प्रतिनिधी) येथील बारावी कला शाखेतील १८ वर्षीय विद्यार्थी गौतम सुतार याने आपल्या रांगोळी कौशल्याने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये रेकॉर्ड कायम केला आहे. त्याने ७१ बाय ५६ इंच गणेश प्रतिमेची पोर्ट्रेट पद्धतीची रांगोळी १० तासांच्या विक्रमी वेळेत पूर्ण केली. त्या निमित्ताने मीरा भाईंदर मधील राजकीय सामाजिक वर्तुळात त्याचे कौतुक होत आहे. शंकर नारायण महाविद्यालयाच्या वतीने सुद्धा या विद्यार्थ्यांचा सत्कार शंकर नारायण ट्रस्ट चे अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी केला. प्रसंगी सचिव महेश म्हात्रे आणि प्राचार्य डॉ. विष्णू यादव सुद्धा उपस्थित होते.

राष्ट्रीय मूल्यकनात महाविद्यालयाला सध्या “अ” दर्जा प्राप्त आहे, मात्र यात वृद्धी करून भविष्यात स्वायत्त दर्जा प्राप्त करण्याचे उद्दिष्ठ डोळ्यासमोर ठेवून महाविद्यालय विविध उपक्रमाचे आयोजन करत असते. महाविद्यालयाच्या अंतर्गत मूल्यमापन समितीच्या (IQAC) विद्यमाने विद्यार्थ्यात कलात्मक मूल्यांची रुजवणूक करणे, स्थानिक कलाकारांना उत्तेजन देणे आदी उद्देशाने रांगोळी चा प्रमाणपत्र अध्यासक्रम मार्च आणि एप्रिल महिन्यात राबवण्यात आला. महाविद्यालयाच्या वर्तमान तसेच माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा या उपक्रमाचा फायदा घेतला. सुप्रसिद्ध रांगोळी कलाकार शैलेश पाटील यांनी या अध्यासक्रमासाठी प्रशिक्षकाची भूमिका पार पडली. याच उपक्रमाद्वारे पहिल्यांदा रांगोळी कलेच्या संपर्कात आलेल्या गौतम ने हा रेकॉर्ड केला आहे. स्वतः बद्दल माहिती देताना गौतम म्हणाला की, मला शाळेत असल्यापासून चित्रकला, पेन्सिल स्केचिंग, पेटिंग आदी सर्व काळात रुची होती. इयत्ता अकरावीला शंकर नारायण महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर पहिल्यांदा आमच्या शिक्षकांच्या माध्यमातून मला कळले की आपल्या महाविद्यालयात रांगोळी चा प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबवला जाणार आहे. त्या मुले मी त्यात लगेचच सहभाग घेतला. १५ दिवसांच्या अल्प कालावधीत, योग्य प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभल्या मुले रांगोळीत नवीन काही करावे अशी इच्छा जागृत झाली. त्यातूनच मी या विक्रमासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले. जागेची समस्या होती. शिक्षक आणि प्राचार्य यांच्या विशेष विनंती वरून शंकर नारायण एज्युकेशन ट्रस्ट ने महाविद्यालयाचे सभागृह उपलब्ध करून दिले. या सर्व उपक्रमाचे विडिओ चित्रीकरण करणे खर्चिक होते. शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीमुळे हा खर्च उभारणे शक्य झाले. आणि त्यातून दिनांक ४ ऑगस्ट च्या दिवसभरात हि रांगोळी पूर्ण केली. चित्रीकरण आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करून झाल्यावर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने त्याच्या या विक्रमला मान्यता दिली. माझ्या काही मित्रांनी मला हे मुलींचे छंद आहेत, तुला का रांगोळी मध्ये आवड आहे? असे म्हणून हिनवले होते, त्याच मित्रांना आज माझ्या बद्दल अभिमान वाटत आहे. आपल्या कुटुंबीयांचे समर्थन, शिक्षकांचा विश्वास आणि महाविद्यालय तर्फे झालेली मदत या मुळे मी हा विक्रम करू शकलो असे त्याने नम्रपणे नमूद केले.

शंकर नारायण एजुकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी सुद्धा गौतम ला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. सध्याच्या महामारीचा सामना करताना आणि भविष्यात सुद्धा धकाधकीच्या आयुष्याचा सामना करताना सकारात्मक छंद, आवड नक्कीच विद्यार्थ्यांसाठी अतिआवश्यक ठरतील. या दृष्टिकोनातून महाविद्यालय विविध अभ्यासपूर्वक उपक्रमांचे आयोजन करत राहील असे प्राचार्य डॉ. यादव यांनी सांगितले. संस्थेचे सचिव महेश म्हात्रे, गौतम चे वर्गशिक्षक निमेश पाटील, महाविद्यालयाच्या IQAC च्या समन्वयक डॉ. सत्याश्री, प्रशिक्षक शैलेश पाटील आदींनी उपस्थित राहून गौतम चे कौतुक केले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे