नवनिर्मिती फाउंडेशन आणि प्रा. आ. केंद्र वांद्रीने आयोजित परदेशात जाणाऱ्या 137 युवकांना देण्यात आली लस
# परदेशात जाणाऱ्या युवकांनी मानले रमजान गोलंदाज यांचे आभार
रत्नागिरी. (प्रतिनिधी) – परदेशी नोकरी व शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना कोरोनाची लस मिळण्यासाठी मोठी अडचणी निर्माण झाल्या होत्या 45 वयाच्या खालच्या लोकांना लस देण्यात येत नव्हती त्यामुळे नोकरीं निमित्ताने परदेशात जाऊन काम काम करणारे अनेक युवक सुट्टी निमित्ताने आप आपल्या गावी आले होते. त्यांना कोरोना लस घेतल्याशिवाय परदेशात जाता येत नव्हते त्यामुळे त्यांना मोठी अडचण निर्माण झाली होती. ती अडचण लक्षात घेवून त्यांना लस मिळावी या हेतूने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदयजी सामंत, खासदार विनायक राऊत, आरोग्य सभापती उदय बने तसेच नगरसेवक सूहेल मुकादम, सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज, जमूरत अलजी यांच्या पाठपुराव्यामुळे तातडीने निर्णय घेत संगमेश्वर, रत्नागिरी तालुक्यातील लोकांचे आज नवनिर्मिती फाउंडेशन यां संघटनेच्या सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्र वांद्री या ठिकाणी कोविल्डशिल्डच्या लसीकरणाचे आयोजन करून सुमारे 137 परदेशात जाणाऱ्या युवकांना लसीकर करण्यात आले.
हे लसीकरण व्यवस्थित आणि नियोजित पणे पार पडण्यासाठी वांद्री आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी एस. एस. फासके, रमेश उमते, राजेंद्र घाणेकर, माया पिलनकर, ज्योती वाडेकर, गणेश लालेवार (शिक्षक) नामदेव जाधव, नंदकुमार गराटे तर नवनिर्मितीचे रमजान गोलंदाज, जमूरत अलजी, तैमूर अलजी, डॉ. सलीम सय्यद, मुजम्मील काझी, विनायक खातू आदिनी प्रयत्न केले. यामध्ये अनेकांनी मदत केली असून लसीकरण यशस्वी होणे करिता सोहेल मुकादम, फैय्याज मुकादम,मुज्जू मुकादम, मुकेश गुंदेजा, अल्पसंख्यांक नेते अल्ताफ संगमेश्वरी, निलेश जाधव, प्रतीक खैरे, यावेळी तहसीलदार संगमेश्वर सुहास थोरात, भाऊ पाटील, रत्नागिरी नायब तहसीलदार कांबळे मॅडम, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गुंजाळवार, संगमेश्वर तालुका आरोग्य अधिकारी सोनावणे मॅडम, वांद्री आरोग्य केंद्राचे कर्मचारी, नवनिर्मिती फाउंडेशन संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य आदी. मोलाचे सहकार्य केल्याबद्दल परदेशात जाणाऱ्या सर्व युवकांनी आभार मानले आहेत.
# रमजान गोलंदाज यांचे काम कौतुकास्पद – समाजकल्याण सभापती परशुराम कदम
वांद्री येथे आयोजित केलेल्या परदेशात जाणाऱ्या युवकांच्या लसीकरण कार्यक्रमासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद समाज कल्याणचे सभापती परशुराम कदम यांनी आवर्जून भेट दिली आणि त्यावेळेस रमजान गोलंदाज यांनी केलेल्या कार्याचे पोट भरून कौतुक केले असून नवनिर्मिती फाउंडेशन या संघटनेच्या माध्यमातून करोनाच्या काळात केलेल्या कामाची रमजान गोलंदाज यांच्या पाठीवर थाप मारुन पोचपावती दिली आणि रमजान गोलंदाज यांचे कार्य कौतुक कौतुकास्पद असल्याचे वक्तव्य केले.