वसई होमगार्ड द्वारे आश्रम शाळेत परीक्षेचे साहित्य वाटप व आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे धडे
# वसई होमगार्ड पथक यांच्याकडून हर घर तिरंगा अभियान आयोजित
वसई. (प्रतिनिधी) – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत वसई होमगार्ड पथक कार्यालयाद्वारे संत गोन्सालो गार्सिया आश्रम येथील विद्यार्थांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले व परीक्षेसाठी लागणारे साहित्य व फळ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी होमगार्ड पथक वसई कार्यालयातील होमगार्ड जवानांकडून हर घर तिरंगा अभियानांतर्गत मा. जिल्हा समादेशक, ठाणे जिल्हा होमगार्ड तसेच जिल्हा कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाद्वारे राष्ट्रीय ध्वजसह बाईक रॅली होमगार्ड कार्यालयातून प्रभारी समादेशक अधिकारी डॉ. सतीश कनौजिया व सेक्शन लिडर अविनाश देशमुख यांच्या निर्देशनात वसई पासून ते तहसिल कार्यालय – वसई पोलीस ठाणे – संत गोन्सालो गार्सिया आश्रम – किल्ला जेटी – प्रांत कार्यालय – 60 फिट मार्गे – वसई बस डेपो मार्ग होमगार्ड कार्यालय वसई पथक पर्यंत काढण्यात आली. सदर बाईक रॅलीचे मनोधैर्य वसई पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी केले. सदर वेळी संत गोन्सालो गार्सिया आश्रम येथील विद्यार्थांना परीक्षेसाठी लागणारे साहित्य व फळ वाटप करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमास प्रमुख अतिथि वसई विरार शहर महानगरपालिका माजी महापौर प्रविण शेट्टी, विशेष अतिथि म्हणून सर डी एम पेटीट हॉस्पीटल, वसई विरार शहर महानगर पालिका येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी, डॉ. विनय, डॉ. मिलींद तसचे माजी होमगार्ड मिलींद नवाथे व जयेश परब उपस्थित होते. सदर कार्यक्रमात माजी महापौर यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच महानगर पालिकेच्या डॉक्टरांकडून आवश्यकता असेल तेव्हा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदतीचे आश्वासन दिले. तसेच होमगार्ड दलाकडून डॉ. सतीश कनौजिया यांनी आश्रमातील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन तसेच योगा बाबत प्रशिक्षण करण्यात आले. रुग्ण हक्क परिषद चे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी यांनी वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी शासनाच्या कोणकोणत्या योजना आहेत त्याची माहिती दिली. दरम्यान सर्व होमगार्ड्सनी मिळून आश्रमातील विद्यार्थांसोबत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. सदर कार्यक्रमास 54 पुरूष व महिला होमगार्ड उपस्थित होते.