आपला जिल्हामहाराष्ट्र

सरकारी कर्मचा-यांना दिवाळीचे अग्रिम २० हजारांपर्यंत द्यावे – भाऊसाहेब पठाण

मुंबई. (प्रतिनिधी) – राज्य सरकारी कर्मचा-यांना सणासाठी उत्सव अग्रिम दिले जात असून त्याची मर्यादा १२,५०० रुपये इतकी आहे, सध्याच्या महागाईचा विचार करता त्यात २० हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्य़क्ष भाऊसाहेब पठाण यांनी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. उत्सवाचे अग्रिम योग्य प्रमाणात मिळाले तर कर्मचारी वर्गाची दिवाळी आनंदात साजरी होऊ शकेल. गेल्या वर्षी उत्सवावर कोरोनाचे संकट होते. त्यामुळे यंदाची दिवाळी उत्साहात साजरी करण्यासाठी राज्य सरकारने याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असेही भाऊसाहेब पठाण यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे