महाराष्ट्र

ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी खा. सुप्रिया सुळे यांची भेट

मुंबई. ( प्रतिनिधी ) – ब्राह्मण समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या व अन्य मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ससंदरत्न बारामती लोकसभा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याशी ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी खा. सुळे यांनी त्वरित सकारात्मक प्रतिसाद देत अधिकारी व संबधीत व्यक्तींना सूचना केल्या. तसेच काही मागण्या आगामी 10 दिवसात परत भेटू तसेच लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा घडवून आणू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्वती मतदारसंघाचे कार्याध्यक्ष विपुल म्हैसुरकर यांच्या पुढाकाराने सदर बैठक आयोजित करण्यात आली होती.

ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करताना खा. सुप्रिया सुळे

याप्रसंगी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे, भालचंद्र कुलकर्णी, लक्ष्मीकांत धडफळे, मंदार रेडे, विजय शेकदार, सौ. वृषाली शेकदार, दिलीप कुलकर्णी, राहुल करमरकर, राष्ट्रवादी कला व सांस्कृतिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील आदी बैठकीस उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे