ब्रेकिंग

प्रत्येक शिवसैनिकाने सद्भावनेने काम करावे – आमदार अंबादास दानवे

प्रत्येक क्षेत्रात आपले स्वबळ वाढले पाहिजे.

संभाजीनगर. (प्रतिनिधी) आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. पार पाडत असताना लहान लहान केलेल्या विकासकामाची मोठी प्रसिद्धी झाली पाहिजे. रिकामे श्रेय आपल्याला नको आहे. आपली शिवसेना ही एक परिवार आणि कुटुंबासरखी काम करते. त्यामुळे सद्भावणेने शिवसैनिकाने काम करावे. अडलेल्याना प्राधान्याने मदत करून पक्ष निष्ठेने शिवसैनिकाने सामाजिक कार्यात अग्रेसर रहावे कारण, हि बाळासाहेबांची शिवसेना असल्याने प्रत्येकाने सद्भावनेने काम करावे असे आवाहन शिवसेना संभाजीनगर जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी वैजापूर तालुक्यात आयोजित शिवसंपर्क मोहिमे प्रसंगी केले.

पुढे बोलताना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे म्हणाले की, संघटनेत सक्रियता असली पाहिजे, काम करण्याची नियत असली पाहिजे, प्रत्येक कामात सातत्य असले पाहिजे. प्रत्येक प्रभागाचा एक शाखाप्रमुख असला पाहिजे हे या शिवसेनेच्या शिवसंपर्क मोहिमेचे उद्दिष्टे आहे. त्यासाठी येणाऱ्या काळात शिवसेनेचे स्वबळाचे हे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी शिवसैनिकांनी ताकदीने काम करावे, संघटनेची पुनर्रचना करावी. असे आवाहन जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केले. तसेच आमदार प्रा. रमेश बोरणारे म्हणाले की, 155 कोटी रुपये कर्ज माफी ठाकरे सरकारच्या कार्यकाळात झाली. शिवसैनिकांनी ही माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यां पर्यंत पोहचवली पाहिजे.वैजापूर तालुका कृषी बाबतीत महाराष्ट्रात 1 क्रमांकावर आहे. बाकीचे पक्ष फक्त निवडणूक आली की तेव्हढ्यापुरतेच काम करतात. मात्र शिवसेनेत काम करण्याची पद्धत वेगळी असल्याने सातत्याने सर्वसामान्य माणसांच्या संपर्कात असते. रामकृष्ण गोदावरीची वरदान ठरणारी योजना लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन यावेळी आमदार बोरणारे यांनी दिले. राज्यभरात शिवसेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 11 ते 31 जुलै दरम्यान राज्यभरात शिवसंपर्क मोहिम राबविण्यात येत असून शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात वैजापूर तालुक्यातील गोळवाडी, भगूर, लासुर, हिंगोणी, भग्गाव, या गावातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी संघटनात्मक पक्षबांधणी, शाखा प्रमुख नियुक्त्या, बुथ रचना ,बुथप्रमुख, गटप्रमुख, सहगटप्रमुख यांच्या नियुक्त्या, पदाधिकारी यांच्या अडीअडचणी, कोरोना मुक्त गाव याविषयी आढावा घेण्यात आला.

यावेळी आमदार प्रा. रमेश बोरणारे, जिल्हा परिषद सभापती अविनाश गलांडे, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, बाबासाहेब जगताप तालुका प्रमुख सचिन वाणी, उपनगराध्यक्ष साबेर भाई, जिल्हा परिषद सदस्य मानाजी मिसाळ,नानासाहेब थोरात, उमेश शिंदे, जी.प. सदस्य वैशाली, नंदू जाधव, प्रकाश चव्हाण, महेश गुंगे, माजी जिल्हापरिषद अध्यक्षा लता पगारे, आदींची उपस्थिती होती.

# प्रत्येक क्षेत्रात आपले स्वबळ वाढले पाहिजे.
प्रत्येक क्षेत्रात आपले स्वबळ वाढले पाहिजे. सर्व जातींधर्मातील लोक आपल्या शिवसेना कार्यकारिणी मध्ये असले पाहिजे ही भूमिका सर्व शिवसैनिकांची असली पाहिजे असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी वैजापूर तालुक्यातील हिंगोणी येथील शिवसंपर्क मोहिमेनिमित्त आयोजित बैठकीत केले.

# आपलासा वाटणारा एक सच्चा शिवसैनिक
गोर-गरीब सर्वसामान्य महिला, वयोवृद्धांना सर्वोतोपरी मदत करणारा आणि जगण्यासाठी आधार देणारा, जो मायेने आणि आस्थेने विचारपूस करणारा, आपलासा वाटणारा एक सच्चा शिवसैनिक म्हणजे आपला माणूस आमदार अंबादास दानवे असल्याची प्रतिक्रिया या शिवसंपर्क बैठकीदरम्यान सवांद साधतांना वयोवृद्ध महिलांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे