हे आहेत नवे मुख्य सचिव व पोलीस महासंचालक
मुंबई. (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन मंत्रालय मुख्य सचिव पदी भारतीय प्रशासकीय सेवा डॉ. नितीन करीर तर महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदाचा तात्पूरता कारभार भारतीय पोलीस सेवा विवेस फणसाळकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ते आज निवृत्त झाले आहेत. त्यानंतर पोलीस महासंचालक पदाचा तात्पूरता कारभार विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार रश्मी शुक्ला यांचे नाव प्रथम क्रमांकावर होते. पण, त्या या पदासाठी इच्छूक नव्हत्या. त्या मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी प्रयत्न करत होत्या.
डॉ. नितीन करीर हे अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई. येथे कार्यरत असून सन 25.08.1988 रोजीचे आयएएस अधिकारी आहेत त्यांना महाराष्ट्रातील विविध भागात काम केल्याचा अनुभव आहे. याअनुषंगाने अ.शा.प.क्र. एईओ – १०२३/प्र. क्र. ४८०/२०२३/दहा/ सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई दि. ३१.१२.२०२३ रोजी अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी डॉ. नितीन करीर भाप्रसे, अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई. यांच्याकडे उक्त आदेशान्वये महाराष्ट्र शासन मंत्रालय मुख्य सचिव हे पद देण्यात आले आहे.