कृषीवार्ता

पालघर जिल्ह्याकरिता मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणाचे सत्र दि. १ जुलै २०२१ पासून सुरु, इच्छुकांनी संपर्क करावा.

पालघर. (प्रतिनिधी) – वसई मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रातून पालघर जिल्ह्याकरिता मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणाचे सत्र दि. १ जुलै २०२१ पासून सुरु होणार आहे. सदर प्रशिक्षण हे सहा महिने मुदतीचे असून त्यात मत्स्यव्यवसाय नौकानयनाची मूलतत्त्वे, सागरी डीझेल इंजिनाची निरनिराळ्या भागाची माहिती व दुरुस्ती, मासेमारीची आधुनिक साधने, प्रात्यक्षिक इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते. सदर प्रशिक्षणा करिता दरमहा दारिद्रय रेषेवरील प्रशिक्षणार्थी यांचेकडून रु. ४५०/- व दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षणार्थी कडून रु. १००/- शुल्क आकारले जाते. सदर प्रशिक्षणाकरिता उमेदवार किमान ४ थी पास व १८ ते ३५ वयोगटातील असावा. इच्छुक उमेदवाराने अर्ज विहित नमुन्यात मच्छिमार संस्थेचे शिफारसपत्र, शाळा सोडल्याचा दाखला व एक फोटोसहीत दि. ३०.०६.२०२१ पर्यंत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वसई येथे वसई मच्छिमार सर्वोदय सहकारी संस्था इमारत पाचूबंदर वसई येथे पाठवावेत. अधिक माहिती करिता अजिंक्य पाटील, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी वसई मो. नं. ९८९२१०३२३५ व श्रीकांत इंगळे ९४२०१८६८७० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी वसई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे