न्यूज वेब पोर्टल parshuramtimes.com चे उद्घाटन – गोविंद कुलकर्णी
मुंबई. ( प्रतिनिधी ) – न्यूज वेब पोर्टल parshuramtimes.com चे उद्घाटन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांच्या शुभहस्ते दूरदृश्य प्रणाली द्वारे करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे कुलकर्णी म्हणाले की, आज डिजिटल इंडिया म्हणून आपण सर्वजण पुढे येत असतो. अशात, parshuramtimes.com उदयास येणे हे खूप आनंद ची बाब आहे. संस्थान श्री भार्गवराम परशुराम मंदिराचे विश्वस्त अभय सहस्त्रबुद्धे म्हणाले की, भार्गवराम परशुराम यांच्या नावाने माध्यम क्षेत्रात एखादे वेब पोर्टल येणे. याची डिजिटल सुरवात होऊन भगवान परशुराम यांनी दिलेला संदेश तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवावे. तसेच आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भगवान श्री परशुराम मंदिरातील एक ऐतिहासिक आठवण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकापूर्वी भगवान श्री परशुराम यांचे चिपळूण येथील मंदिरात येऊन दर्शन घेतले व यथासांग पूजन केले. 1661 साली त्यांनी दर्शन घेतल्याचा उल्लेख सापडतो. छत्रपती शिवाजी महाराज हे कायम भगवान श्री परशुराम यांचे दर्शनासाठी येत असत. अशी माहिती सहस्त्रबुद्धे यांनी दिली. समस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा. मनोज कुलकर्णी उर्फ काकासाहेब म्हणाले की, दि. 06 जून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून parshuramtimes.com या न्यूज वेब पोर्टल चे उद्घाटन होत आहे. हे एक उल्लेखनीय कार्य आहे. यावेळी, parshuramtimes.com चे संस्थापकीय संपादक यांनी पत्रकारिता क्षेत्रातील आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ट महाविद्यालयाचे शिक्षक निमेश पाटील यांनी केले.
याप्रसंगी दूरदृश्य प्रणाली द्वारे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, संस्थान श्री भार्गवराम परशुराम मंदिराचे विश्वस्त अभय सहस्त्रबुद्धे, डॉ. प्रशांत पटवर्धन, व्यवस्थापक शंकर कानडे, जयदीप जोशी, समस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा. मनोज कुलकर्णी उर्फ काकासाहेब, शिक्षक निमेश पाटील आदी उपस्थित होते.