आपला जिल्हा

मंत्रालयावर होणाऱ्या आक्रोश मोर्चात बिरसा फायटर्स शामिल होणार – सुशीलकुमार पावरा

मुंबई. (प्रतिनिधी) – आरक्षण हक्क कृती समिती मार्फत आयोजित 26 जून 2021 रोजीच्या आक्रोश मोर्चाला बिरसा फायटर्सचा पाठिंबा असून मोर्चात बिरसा फायटर्स सहभागी होणार असल्याची माहिती बिरसा फायटर्सचे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे. याबाबत राज्य निमंत्रक आरक्षण हक्क कृती समिती महाराष्ट्र यांना सुशीलकुमार पावरा यांनी बिरसा फायटर्सचे पत्र पाठवले आहे.

पत्रात कळवले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या संविधान विरोधी धोरणाविरोधात आरक्षण हक्क कृती समितीच्या 26 जून 2021 रोजी मुंबई येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चाला बिरसा फायटर्सचा पाठिंबा असून मोर्चात बिरसा फायटर्स संघटना शामील होणार आहे. संवैधानिक हक्क व आरक्षण संपविण्याच्या षडयंत्र विरूद्ध अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमूक्त जमाती, विशेष मागास वर्ग आणि ओबीसी समाजाचे हे जनआंदोलन असून 80 पेक्षा अधिक मागास वर्गीय संघटना या मोर्चात शामिल होणार आहेत. दि. 26 जून 2021 रोजी सकाळी 11.30 वाजता आझाद मैदान मुंबई येथून या आक्रोश मोर्च्याला सुरवात होणार आहे. पदोन्नतीतील आरक्षण बंद, शिष्यवृत्ती फ्रीशीप बंद,खाजगीकरण, कंत्राटीकरण, कामगार हिताचे 44 कायदे रद्द, नवीन शैक्षणिक धोरणात आरक्षण बंद, ओबीसींना पदोन्नतीत व स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षण, शेतकरी विरोधी कायदे, अन्याय अत्याचारमध्ये वाढ,कोरोना काळात मोफत रेशन, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी, बारा बलुतेदारांना आर्थिक सहाय्य इत्यादी विषयांवर हा आक्रोश मोर्चा आहे. या मोर्चात आमची बिरसा फायटर्स संघटना शामिल होणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स संस्थापक सुशीलकुमार पावरा यांनी दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे