अलिबाग पेझारी चेक पोस्टवर पर्यटकांना माघारी फिरवल्याने नाराजी
# अलिबाग व्यावसायिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
# पर्यटन व्यवसाय बंदीच्या प्रशासकीय आदेशाची मागणी
अलिबाग. (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाने कोविड-19 मध्ये सध्याच्या काळात अंतर जिल्हा बंदी उठविली असल्याने पर्यटक अलिबाग तालुक्यात येऊ लागले असून दि. 19 जून रोजी पोलीस पेझारी चेकपोस्ट वरून पोलिसांनी जबरदस्ती ने माघारी पाठविण्यात आल्या बद्दल पोलीस प्रशासन तर्फे रायगड च्या जिल्हाधिकारी निधी चोधरी यांना अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्थेने दिले आहे.
पत्रात ते म्हणतात की, अलिबाग मध्ये येणाऱ्या पर्यटकांना माघारी पाठविण्यात आले त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अलिबागची प्रतिमा मलिन झाली असून पर्यटक व्यवसायिकाच्या रोजगारची संधी गेल्यामुळे आर्थिक भुर्दंड पडला. कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेमुळे पर्यटन व्यवसाय बंद करणार असाल तर तसे पत्र, सूचनांचे प्रशासकीय आदेश आम्हाला मिळावा. ज्यामूळे लांबून येणाऱ्या, बुकींग केलेला पर्यटकाना त्याची कल्पना मिळेल व ते प्रवास करणार नाहीत असे संस्थेचे अध्यक्ष निमिष परब यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या पत्राच्या प्रत पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद, तहसीलदार अलिबाग, उपसंचालक कोकण विभाग पर्यटन, यांना दिले आहेत.