आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

प्रत्येक व्यक्तीस आशीर्वाद लाभावा म्हणूनच प्रभु श्री धनकुबेर यांची प्राणप्रतिष्ठा – विनोद सिंह

# धन दैवतांची पूजा करण्याचे आवाहन

पालघर. ( प्रतिनिधी ) – प्रत्येक व्यक्तीस आशीर्वाद लाभावा म्हणूनच प्रभु श्री धनकुबेर यांची प्राणप्रतिष्ठा केली असल्याचे वाडाखडकोना श्री गोमातेश्वरी अंबाधाम आश्रमचे अध्यक्ष विनोद सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. दरम्यान माता चामुंडा देवी, माता महाकाली, माता सरस्वती, श्री. खाटूराम यांची देखील प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

प्रभू श्री धनकुबेर

यावेळी सिंह म्हणाले की, फक्त दिवाळी सणातील धनत्रयोदशी किंवा धनतेरस च्या दिवशी आपण धनलक्ष्मी ची पूजा करत असतो. आणि वर्षभर अधूनमधून आपल्या काही आर्थिक अडचणी जाणवली तर आपण धनलक्ष्मीची पूजा करत असतो. तसेच, आपण सर्वजण वर्षभर काबाडकष्ट करत असतो तरी देखील आपल्याकडे हवी अशी धनप्राप्ती होत नाही. धनप्राप्ती व्हावी म्हणून आपण धनलक्ष्मीची पूजा दररोज सकाळी करत असतो. परंतु एका बाजूला आपण धनलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण, धन कुबेर यांना देखील प्रसन्न करण्याचे तितकेच महत्त्वाचे असून त्यांची आवश्यकता आहे. याची माहिती आम्हाला काही ग्रंथांमधून आमचे मित्र एस. मुलाणी यांच्या वाचनातून मिळाल्यानंतर आम्ही धनकुबेर यांचे मंदिर स्थापन करण्याचा मानस केला. त्यानंतरच आम्ही भगवान प्रभू श्री धन कुबेर यांचे मंदिर बनवून त्यांची प्राणप्रिष्ठा करण्याचे निश्चित केले. आणि तो सुवर्ण दिन उजाडला आहे. आम्ही तमाम जनतेला आव्हान करू इच्छितो की, प्रभु श्री धनकुबेर यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाडाखडकोन मनोर जवळ श्री गोमातेश्वरी अंबाधाम आश्रम परिसरात येऊन आपण प्रभू श्री धनकुबेर यांची पूजा करून आपली मागणी प्रभू श्री धनकुबेर यांच्याकडे करावी जेणेकरून आपणास आशीर्वाद लाभेल असे आश्रमचे अध्यक्ष विनोद सिंह म्हणाले.

प्रवक्त्या सौ. धनश्री केळशीकर यांनी मंदिर प्रवेश व मंदिर मधील आचारसंहिता कोणकोणती आहेत याचे सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी आश्रमाचे अध्यक्ष विनोद पारसनाथ सिंह, मनोज पारसनाथ सिंग, दिलीप सिंग, नितीन बोंबाडे, एस. मुलाणी, हवालदार दुबे यांनी विशेष मेहनत घेतली. याप्रसंगी माजी आमदार आंनद ठाकूर, आ. अमित घोडा, डॉ. ओमप्रकाश दुबे, प्रकाश दुबे, हवालदार दुबे, विनोद पारसनाथ सिंग, मनोज सिंग, सुमित सिंग, विठ्ठल जोशी, हेमंत धर्ममेहेर, सुशील शहा, दिलीप सिंग, एस. मुलाणी, नितीन बोंबाडे, धनश्री केळशीकर, प्रशांत पाटील, पंडित चव्हाण, प्रदुम शर्मा, सुमित गुप्ता, जे.पी. यादव, बॉबी वाल्मिकी, सचिन विष्ट, विशाल मदेशिया, सचिन विष्ट, विजय सिंह, राध्ये, श्याम मदेशीया, आशिष सिंग, भरत कचरे, सर्वेश तिवारी आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे