महाराष्ट्र

लाडकी बहीण योजनेचे अर्ज झाले गायब..!

मुंबई. ( प्रतिनिधी ) – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात ज्या महिलांनी वेबसाईट वरून अर्ज केला आहे अश्या महिलांचे अर्ज गायब झाले आहे असे अनेक महिलांनी परशुराम टाईम्स न्यूज पोर्टल शी बोलताना सांगितले आहे.

वेबसाईटवरून अर्ज केला आहे. आणि तो अर्ज आता गायब झालेला आहे मग आता पैसे मिळणार का ? डेटा नॉट फाउंड येत आहे. लॉगिन केल्यानंतर ओटीपी वगैरे काहीच येत नाही. अर्ज वगैरे तिथे काही दिसत नाही आमचा. आता आमच्याकडे अर्ज भरल्याचा नेमका पुरावा काय ? आता काय करायचं, टेन्शन वाढलं ? कारण एकही हफ्ता मिळाला नाही. खरंच तर ते खरंच गरजवंत होते त्यांना पैसेच मिळाले नाहीत जे खरे लाभार्थी होते त्यांना पैसे मिळत नाहीत मग आता अशा लोकांनी काय करायचं ? वेबसाईटवरून डेटा गेला तिथे डेटा नॉट फाउंड येत आहे. लॉगिन केलं तरी काही दिसत नाही स्टेटस काय आहे हे दिसत नाही या सगळ्या गोष्टी सध्या होत आहे तर त्याच्यावरती काय करायचे ?

# कारण हे तुमच्या सोबत होऊ शकतो !
खरं तर अनेक गोर गरीब स्त्रिया खरे लाभार्थी आहेत. तरीपण काहींना असं होत आहे. तर बरोबर आहे. आपल्या माता बहिणीचं सुद्धा म्हण ज्यांना खरच गरज आहे अशा लोकांना अजून पैसे आलेले नाहीत. अनेक लोक या लाभापासून वंचित आहेत.

यावेळी अनेक महिलांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट वर त्यांनी भरलेला अर्ज लॉगीन करून पाहिला असता त्यांना No Data Found असा पर्याय येत आहे. त्यामुळे त्या महिलांमध्ये संभ्रम तेचे वातावरण पसरली आहे. उक्त विषयाच्या  आय.टी. तज्ञांकडून माहिती घेतली असता. https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जास्त ताण आला असेल त्यामुळे डेटा नॉट फाउंड असे येत असावे असा त्यांचा अंदाज आहे.

# शासन निर्णयात काय म्हटलं आहे ?
राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या अर्जाच्या प्रक्रियेसंदर्भातील घेतलेल्या निर्णयानुसार, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्येही या योजनेंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी आधी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका, समूह संघटक-CRP (NULM, MSRLM व MAVIM)”, मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager). आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आलं होतं. मात्र, सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तिना अर्ज स्विकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार, आता फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्विकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका महिलांकडून अर्ज भरून घेणार. अर्जांची छाननी झाल्यानंतर अंगणवाडी सेविकाच त्याची नोंदणी ऑनलाईन करणार आहेत, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालकडून मिळाली. त्यामुळे तुम्ही अजूनही अर्ज भरला नसेल तर लवकरात लवकर जवळच्या अंगणवाडीत जाऊन सेविकांशी संपर्क साधा.

# अजून पर्यंत एक पैसा आला नाही आणि आता वेबसाईटवरून भरलेले अर्ज सुद्धा गायब झाले आहेत हा काय प्रकार आहे आमच्याकडे अर्ज भरलेला चा पुरावा काय ? तर,आता वेबसाईटवरून खूप जणांचे अर्ज हे गायब झालेले आहेत. लॉग इन केल्यानंतर डेटा नॉट फाउंड असे येत आहे. अशी अनेक लोकांचे अडचण झालेली आहे आणि त्यांच्या तक्रारी देखील वाढलेले आहेत.

# काही जणांचे तर अर्ज मान्य नाही झाले आहे तर काही जणांचे अर्ज मान्य होऊन सुद्धा त्यांचा अर्जाचा डेटा नॉट फाउंड दाखवत आहे.

तर, ज्यांचा अर्ज मान्य नाही आहे आणि त्यांचा पण डेटा दाखवत नाही त्यांचे काय ? आता तुमचा अर्ज मान्य आहे. परंतु, डेटा नॉट फाउंड असे दाखवत असेल तर तुम्ही अजिबात काळजी घेऊ नका. सध्या सर्व्हर वर प्रचंड ताण आलेला असेल. सध्या जे अर्ज आहेत ते पडताळणीच्या प्रक्रिये मध्ये आहेत. कामकाज जास्त चालल्यामुळे तुमचा तो डेटा नॉट फाउंड ऑप्शन तिथे येऊ शकतो. सध्या त्याच्यावरती काम चालू आहे तरी कोणीही टेन्शन घेऊ नका सर्व्हर वर ताण आला असल्यामुळे अनेक युजेस असतात आणि भरपूर जण लॉग इन असतात. तर वेबसाईटचे असेच असते. भरपूर ताण आला. तर सर्व्हर डाऊन होतात त्यामुळे अश्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच, तुम्हाला तुमचा जो डेटा आहे तो दिसत नाही तर अर्ज मान्य झाला आहे त्यांचं आता पुढे प्रक्रिया मध्ये आहे. तुमचा जो पुढचा जो काही येणारा हफ्ता आहे. त्याच्यासाठी तुमच्या नावाची यादी पुढे गेलेली असेल. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुमच्या खात्यात मध्ये पैसे येतील. आजपासून अजून पुढील तीन दिवस पैसे येणार आहेत. तर त्यांनी कुणीही टेन्शन घेऊ नका तुम्हाला कुठलाही पुरावा द्यायची गरज नाही.

तुम्ही जेव्हा फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला एप्लीकेशन आयडी मिळतो आणि तुम्हाला जर आता लॉगिन केलं तर तुम्हाला जर डेटा दिसला तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आणि लक्षात घ्या तुमचा कुठे फॉर्म गेलेला नाही गायब झालेला नाही तो तात्पुरता काळासाठी तो सर्व्हर बंद झालेला आहे त्यामुळे तुम्हाला तुमचा जो डेटा आहे तो दिसत नाही. पण बरोबर आहे की, आपण साहजिक आहे आपल्याला वाटलं की आपलं फॉर्म गायब झालेला आहे आम्हाला पैसे सुद्धा नाही मिळाले तर काय करायचे ? डेटा नॉट फाउंड दाखवत आहे फॉर्म भरला आहे अजून अर्ज मान्य नाही झाला.तर लक्षात घ्या तुमचा जो फॉर्म भरला आहे तो जर तुम्ही 31 ऑगस्ट च्या अगोदर भरला असेल तर तो लवकर लवकर मान्य होईल आणि ज्यांनी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला आहे. त्यांनी लक्षात घ्या सप्टेंबर मध्ये भरलेला फॉर्म आहे म्हणजे अजून पडताळणीमध्ये आहे. खूप जणांचं असं होत असेल तर कोणीही घाबरून जाऊ नका सगळ्यांना पैसेही येणार आहेत. त्यामुळे कोणीही टेन्शन घेऊ नका डेटा दिसत नाही काही प्रॉब्लेम नाही सध्या थोडा वेळ तसेच राहू द्या परत चेक करा डेटा 100% तुम्हाला दिसणार अर्थ असा नाही की तुमचा पैसे गायब झाले पैसे येणार आहेत तुमचा डेटा सुद्धा परत येणार आहे त्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका सगळ्याला पैसे मिळणार असे सांगण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे