महाराष्ट्र

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मोईन मियाँचे केले कौतुक…

मुंबई. (प्रतिनिधी) – गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादुन्नबी उत्सवाच्या आगमनाने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची कोंडी वाढली होती. अशा परिस्थितीत ऑल इंडिया सुन्नी जमीयतुल उलेमाचे अध्यक्ष हजरत सय्यद पीर मोईन मियाँ साहेब यांनी 18 सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्याचा सर्व संमतीने निर्णय घेतला. या उपक्रमामुळे दोन्ही सण शांततेत संपन्न झाले. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुंबईतील बिलाल मस्जिद येथे मोईन मियाँ यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले.

ईद-ए-मिलाद-उन-नबी हा सण पैगंबर मुहम्मद यांचा जन्मदिवस आहे. गणेशोत्सवही त्याच दिवशी होता. अशा परिस्थितीत संघर्ष टाळून दोन्ही सण साजरे केले. गेल्या 2 वर्षांपासून सामंजस्याची भूमिका घेतली जात आहे. ऑल इंडिया सुन्नी जमीयतुल उलेमाचे अध्यक्ष हजरत सय्यद पीर मोईन मियाँ साहेब यांच्या या भूमिकेचे खासदार अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी कौतुक करून त्यांचा सत्कार केला. यावेळी रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नूरी, आमदार अमीन पटेल, इस्लाम जिमखाना अध्यक्ष युसूफ अब्राहानी, ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनचे मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी, ॲड. रिझवान मर्चंट, इब्राहिम खान, अस्लम लाखा, अक्रम खान, बाबू बत्तेली, अबू स्वालेह आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे