मुंबई मनपा निवडणूकीत आरपीआय तर्फे महिलांना 50 टक्के उमेदवारी देणार – रामदास आठवले
मुंबई. ( प्रतिनिधी ) – रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने वीर सावरकर सभागृहात जागतिक महिला दिना निमित्त महिला संमेलन चे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ; क्रांतिज्योत माता सवित्राबाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई या महामातांचा संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्यात आले. यावेळी कोरोना काळात रुग्णसेवा केलेल्या महिला डॉक्टर आणि परिचारिका यांचा कोविड योद्धा म्हणून रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय केंद्रिय राज्यमंत्री लोकनेते रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरम्यान आठवले म्हणाले की, सर्व जाती धर्माच्या महिलांना समान न्यायहक्क मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदुकोड बिल सादर केले. महिला जगृत झाल्या तरच समाज जागृत होतो. आई शिक्षित झाली तर सर्व समाज जागृत होईल असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगत असत. यावेळी मा.सौ.सीमाताई आठवले, जीतभैय्या आठवले, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनपा रुग्णालयातील परिचारिका रुचिता विजय कांबळे, प्रज्ञा गोपीनाथ भोसले, लिलबेन परमार, सुनीता माळवे, दिनाबेन वाघेला यांचा कोविडयोद्धा म्हणून लोकनेते रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित महिला संमेलनास लोकनेते रामदासजी आठवले, .सौ. सीमाआई आठवले, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, ऍड.आशाताई लांडगे, फुलाबाई सोनवणे, सौ. शिलाताई गांगुर्डे, सौ. नैना वैराट उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइं महिला आघाडी च्या मुंबई अध्यक्षा ऍड. अभयाताई सोनवणे आणि स्वागताध्यक्ष उषाताई रामळू उपस्थित होत्या. यावेळी रिपाइं युवक आघाडी मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड, जिल्हा अध्यक्ष प्रकाश कमलाकर जाधव, विलास तायडे, सिद्धार्थ कासारे, सोना कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. महिलांची प्रचंड उपस्थिती होती.