शेकाप आ. स्व. गणपतराव यांचे एकनिष्ठ कर्तृत्ववान स्वीय सहाय्यक अनिल खरात
# गणपतराव देशमुख यांच्या सहित सोशल मीडियावर वायरल होणारा तो फोटो
एकच झेंडा, एकच पक्ष – शेकाप, एकच मतदार संघ – सांगोले, एकच पी. ए. – अनिल खरात, एकच ड्रायव्हर – सलीम मुलाणी.
मुंबई / सांगोला. (प्रतिनिधी) – भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सांगोला विधानसभा माजी आमदार डॉ. कॉम्रेड भाई गणपतराव देशमुख यांचे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय स्वीय सहाय्यक अनिल खरात होते. एस. टी. महामंडळ मधून प्रवास करताना देशमुख यांच्या सहित सोशल मीडियावर तो फोटो जोरदार वायरल होत असून एस.टी. तील आमदारांची रिझर्व्ह सीट आता बंद करा. एस.टी. ने प्रवास करणारा शेवटचा आमदार आज गेला. अशी प्रतिक्रिया असणारी पोस्ट वायरल होत आहेत.
स्व. गणपतराव देशमुख हे एकच पक्षातून, एकाच झेंड्या खाली तर एकच मतदार संघातून तब्बल 11 वेळा आमदार होते. तर 2 वेळा मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. या दरम्यान अनेक खाजगी सचिव, विशेष कार्य अधिकारी, शासकीय स्वीय सहाय्यक, खाजगी स्वीय सहाय्यक असे अनेक अधिकरी व कर्मचारी यांनी काम पाहिले आहे. पण, आमदार असो किंवा नसो अशात देखील काम करणारे स्वीय सहाय्यक अनिल खरात हे ओळखले जातात. आबासाहेबांना डोळ्याचा रेटिनाचा प्रॉब्लेम असल्याने स्वीय सहाय्यक अनिल खरात दररोज सकाळी वर्तमानपत्रातील पान अन् पान आणि ओळ अन् ओळ आबासाहेबांना वाचून दाखवत असत. त्या नंतर आबासाहेबांचा दिनक्रम सुरू होत असे. मुंबई मनोरा आमदार निवास ते विधानभवन ते मंत्रालय शक्यतो पायी चालत जात असे. अधिवेशन काळात तर विधानसभेत एक तास अगोदर जाऊन दिवसभराच्या कार्यक्रमातील तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके, ठराव विधानसभेचा लॉबीमध्ये बसून अनिल खरात वाचत असत आणि आबासाहेब शांतचित्ताने लक्षपूर्वक ऐकत असत. विधानसभेच्या लॉबीमध्ये इतर आमदारांच्या स्वीय सहाय्यक यांना प्रवेश नव्हता. फक्त महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षांच्या परवानगीने फक्त अनिल खरात यांनाच प्रवेश होता. सकाळी लॉबीमध्ये वाचून दाखवत व आबासाहेब सभागृहात गेल्यानंतर इतर कामे पद्धतशीरपणे आटोपून उद्याच्या कामकाजाची पूर्ण तयारी करून परत आबासाहेब सभागृहाच्या बाहेर यायच्या अगोदर वेळेवर लॉबीमध्ये उपस्थित असायचे. आणि मग अनिलच्या उजव्या हातात आबांची काळी सुटकेस आणि डाव्या हाताला आबा धरून बाहेर यायचे. तेव्हा उपस्थित सर्व जण कुतुहलाने आणि आदराने त्यांच्याकडे पाहत असत. एवढ्या वयात ही 2019 पर्यंत अधिवेशनासाठी मुंबईला आले असता मरिन ड्राइववर व नागपुर अधिवेशन साठी आले असता नागपूरच्या कडक थंडीतही आबासाहेबांच्या बरोबर पहाटे – पहाटे अनिल खरात सतत दिसायचे. आबासाहेब कामाच्या बाबतीत स्ट्रिक्ट असायचे पण स्वीय सहाय्यक अनिल खरात त्यांच्या सोबत 12 वर्षे सेवा करत होते. अधिवेशन काळात 24 तास गणपतराव देशमुख यांच्या सोबत असायचे तसेच आठवड्यातून दोन ते तीन दिवस विधिमंडळाच्या किंवा मंत्रालय मीटिंग साठी मुंबई, पुणे येथे सोबत असत. आबासाहेबांच्या शासकीय स्वीय सहाय्यकापैकी मुंबई ला येणारे अनिल खरात हे पहिलेच स्वीय सहाय्यक. अनिल खरात हे गणपतराव देशमुख यांचे स्वीय सहाय्यक म्हणून गेली 12 वर्ष म्हणून काम करत होते.
# तो फोटो
एस. टी. महामंडळ मध्ये बस सेवेत आमदारांना 2 शीट राखीव असतात. एस. टी. बसने प्रवास करणारे एकमेव आमदार अशी देशमुख यांची ख्याती होते. देशमुख यांचे वृद्धपकाळाने दि. 30 जुलै 2021 रोजी निधन झाल्यानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बस मधून उतर असताना तो फोटो सर्वत्र वायरल झाला. काहींनी त्या फोटो चे व्हाट्सअप स्टेटस ठेवले तर काहींनी व्हिडिओ बनवले अशाप्रकारे तो फोटो व्हायरल झाला. साधारण सन 2017 साली नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार निवास ते नागपूर विधानभवन मध्ये एस. टी. महामंडळ ने कायम प्रवासात करत असे. वयोमानानुसार आबासाहेबांना मदतीची गरज लागत असे. त्यावेळी कायम अनिल खरात सोबत असत. खरात हे आबासाहेबांना नेहमी सहाय्य करत असे. बस मधून उतर असताना आपल्या साहेबांना काही त्रास होऊ नये म्हणून खरात आबासाहेबांना हात देत असे. त्यावेळी तो फोटो एका कार्यकर्त्यांनी काढला असावा असा अंदाज आहे.
# आबासाहेबांचे एकनिष्ठ वाहन चालक सलीम मुलाणी

गेल्या 25 वर्षांपासून अधिक काळापासून स्व. गणपतराव देशमुख यांचे वाहन चालक म्हणून सलीम मुलाणी यांनी काम पाहिले आहे. आबासाहेबांचे दौरे, मतदार संघातील भेटीगाठी याठिकाणी सलीम हेच सोबत असे. एका व्हिडीओ मध्ये सलीम मुलाणी म्हणाले की,आयुष्य भर आबासाहेबांची सेवा केली. आता मागची खुर्ची रिकामी झाली नाही तर माझी गाडी रिकामी झाली. आता गाडी चालविणार नाही, असे भावनिक मत त्यांनी व्यक्त केले.