…हे तर मद्य विकास आघाडी चे सरकार – आचार्य तुषार भोसले
मुंबई. ( प्रतिनिधी ) – हे तर मद्य विकास आघाडी चे सरकार असा घणाघात महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केले आहे.
भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांच्या व्हिडीओ https://www.facebook.com/107127794359787/posts/428359722236591/
महाराष्ट्र राज्य सरकारने आयात केलेल्या स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क 150 टक्क्यांनी कमी केले आहे जेणेकरून दारूची किंमत इतर राज्यांच्या बरोबरीने ठेवता येईल. इम्पोर्टेड स्कॉच व्हिस्कीवरील उत्पादन शुल्क उत्पादन खर्चाच्या 300 टक्क्यांवरून 150 टक्के करण्यात आले आहे. यासंदर्भात नुकतेच अधिसूचना जारी करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. आयात केलेल्या स्कॉचच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वार्षिक 100 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. अधिकाऱ्याने असेही सांगितले की, एक लाख बाटल्यांवरून 2.5 लाख बाटल्यांची विक्री वाढण्याची अपेक्षा असल्याने महसूल 250 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. ड्युटी कमी केल्याने इतर राज्यांतून होणारी स्कॉचची तस्करी आणि बनावट दारूच्या विक्रीलाही आळा बसेल, असे ते म्हणाले. उत्पादन शुल्कात कपात केल्याने महाराष्ट्रात आयात होणाऱ्या व्हिस्कीच्या किंमती कमी झाल्या आहेत. या कारणामुळे राज्याच्या महसुलात वाढ होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रासह संपुर्ण देशात सरकारला दारूपासून सगळ्यात जास्त महसूल येतो. महाराष्ट्रात व्हिस्कीच्या दरात कपात करण्यात आल्याने तळीरामांना दिलासा मिळाला आहे. उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात करण्यात आल्याने व्हिस्कीच्या किंमतीत कमालीची घट झाली आहे.
यावर आचार्य भोसले म्हणाले की, ज्ञानोबा-तुकोबांच्या महाराष्ट्रात फक्त आता व्यसनी लोकांसाठी निर्णय घेतले जातात आहेत. एकीकडे शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. एसटी कर्मचारी संपावर आहे पेट्रोल डिझेल ला कोणती सवलत नाही आणि दुसरीकडे दारु ला मात्र विशेष सवलत सातत्याने दिली जाते या राज्यांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून ” राक्षसी सत्ता ” राज्य करते. हे महा विकास आघाडीचे नाही तर मद्य विकास आघाडीचे सरकार आहे ते सिद्ध झालंय, असा घणाघात महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केले आहे.