एस.टी. महामंडळातील महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करा – अॅड. गुणरत्न सदावर्ते
मुंबई. ( प्रतिनिधी ) – एस.टी. महामंडळातील महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करा अशी मागणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे.
यावेळी अॅड. सदावर्ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, आता एस. टी. महामंडळाकडून हे आंदोलनावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू झालाय. नाशिकच्या 01 नंबर आगार बाहेर एस. टी. महामंडळ कर्मचारी आंदोलन करत आहे. मात्र, आता मुंबईहून एस.टी. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी येऊन या कर्मचाऱ्यांना आंदोलन बंद करा ! कामावर रुजू हा ! अन्यथा… असा दबाव तंत्र सुरू झालाय. धक्कादायक बाब म्हणजे आंदोलन कर्ता महिलांसोबत असभ्य असे वर्तन या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर कार्यवाहीची मागणी एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.