RSS प्रणित MRM ; शैक्षणिक ठिकाणी धार्मिक बाबींची दखल नको – इरफान पिरजादे
मुंबई. ( प्रतिनिधी ) – शैक्षणिक क्षेत्रामध्ये सर्वसामान्यप्रमाणे वागले पाहिजे आणि शिक्षण पूर्ण करून, देशाला पुढे नेण्याचे काम युवा पिढीने केले पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक इरफान पिरजादे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.
यावेळी पिरजादे म्हणाले की, ज्यांनी ‘जय श्री राम’चा नारा दिला आणि त्या मुलीला घाबरवण्याचा प्रयत्न केला ते पुर्णपणे चुकीचे आहेत. मुस्कान खान या कर्नाटकातील विद्यार्थिनीच्या हिम्मतील दाद दिली पाहिजे, ‘हिजाब’ या विषयाचा ज्या प्रकारे मुस्लिम संघटना बाऊ करता आहेत त्यामुळे मुलींच्या शिक्षणावर तसेच इतर समाजाचा पाहण्याचा दृष्टी कोणावर परिणाम होतील. भारतीय संस्कृतीचा सर्व समावेशक आहे, विविध चालीरीती व परंपरेचा हा देश खूप गुण्या गोविंदाने नांदतो आहे, परंतु काही सामाजिक घटकाना भारतात शांतता नको आहे. काही राजकीय पक्ष हिजाब विषयाला घेऊन समाजात दुफळी माजवण्याचा प्रयत्न करीत आहे.
# मुलींना हिजाब घालण्याच्या विषयात कोर्टात जाणे म्हणजे पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे.
हा विषय महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाशी बोलून संपवता आला असता. दोन्ही समाजाचे समंजस लोकांनी भेटून संवादातून हा विषय मिटलाही असता पण काही लोकांची दुकानदारी आशा प्रकारची कृत्ये करून चालू आहे हे दिसते आहे.
आपला धर्म आपल्या उंबरठ्याबाहेर नेऊन त्याचा अपमान करण्याचे काम पीएफआय सारखी संघटना करीत आहे. मुस्लिम धर्माच्या आडोश्यात देशाची बदनामी करण्याचे काम काही लोक करत आहेत. तेथील शासन, प्रशासन सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशनला पूर्ण करेल अशी आशा आहे.