विदयमान परिस्थिती हि संविधानाला घातक – राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण
मुंबई. ( प्रतिनिधी ) – राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर माजी आमदार व प्रवक्त्या विद्याताई चव्हाण यांनी चैत्यभूमी जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.
विदयमान परिस्थिती हि संविधानाला घातक आसुन, संविधानात दिलेली समाज कल्याणाची मूल्ये संपुष्टात आणाली जात आहेत, संविधान जाळलं जात असुन देशातील बहुजन समाज महागाई, बेरोजगारी, जातीयवाद, शैक्षणिक बाजारीकरणात होरपळलाय जातो अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून, संविधान विरोधी शक्तीला गाडण्याचा निर्धार आम्ही करत असल्याचं मत या प्रसंगी विद्याताई चव्हाण यांनी मांडले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यावर चैत्यभूमी येथे इंदू मिलचे प्रणेते चंद्रकांत भंडारे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन विद्याताई चव्हाणांचा सत्कार केला.यावेळी विशाल हिवाळे, डॉ सुरैना मल्होत्रा सुखदेव मोहोड, अर्चना ताजणे, जीवन तांबे, संदिप डांगे, वनिता तोंडवळकर, सारा वाडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.