देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

मुसलमानांचा सर्वांगीण विकास हेच आमचे उद्दिष्टे – मुरामं इंद्रेश कुमार

# रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे प्रतिपादन

मुंबई. (प्रतिनिधी) – मुसलमानांचे सर्वांगीण विकास हेच आमचे उद्दिष्टे असल्याचे मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी उत्तन भाईंदर येथे पश्चिम क्षेत्र स्तरीय अभ्यास वर्गामध्ये केले आहे.

यावेळी कुमार म्हणाले की, मुस्लिम समाजाचा विकास करण्यासाठी आम्ही गेल्या 20 वर्षांपासून कार्यरत आहोत, आम्ही दरवर्षी पर्यावरण जनजागृती करत आहोत, त्यातून रेहान जन्नती झाडाचे वृक्षारोपण करण्याचे करून पर्यावरण विषयी प्रेम वाढविण्याचे काम करत आहोत. अन्न बँक स्थापन करून गरजवंताला मदत करण्याचे कार्य आमचे सुरू आहे. तसेच येणाऱ्या काळात मुस्लिम समाजात सर्वात मोठी संघटना म्हणून मुस्लिम राष्ट्रीय मंच काम करेल असा विश्वास इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केला. तसेच मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक इरफानअली पिरजादे म्हणाले की, आम्हाला मुस्लिम समाजा विषयी जो द्वेष निर्माण केला जातो तो कायमस्वरूपी दूर करून समाजात एकता निर्माण करावयाची आहे. त्यासाठी आवश्यक असेल तिथे आम्ही समाज प्रबोधन करू. आणि वैचारिक दृष्टिकोन निर्माण करू तसेच मुस्लिम राष्ट्रीय मंच मध्ये अधिकाधिक बंधू भगिनींनी सहभागी व्हावे असे आव्हान देखील पिरजादे यांनी केले आहे.

दरम्यान महाराष्ट्रातुन कोकण प्रांत, पश्चिम महाराष्ट्र,खान्देश, मराठवाडा साधारण 200 मुस्लिम बंधू – भगिंनी प्रशिक्षणात सहभाग घेतला होता. यावेळी मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांच्या हस्ते संघटनेच्या नवनिर्वाचित कोकण प्रांत संयोजक मुस्ताक शेख, महिला संयोजक आयशा सैयद, युवा संयोजक सगीर शेख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक ताहीर असी, महिला संयोजक रेश्मा पठाण, देवगिरी प्रांत संयोजक मोहम्मद अकबर कादरी, सहसंयोजक डॉ. रियाज शेख, युवा संयोजक शेख फैजल, उत्तर महाराष्ट्र प्रांत संयोजक तोफिक शेख, युवा संयोजक अजहर शहा मुंबई महानगर संयोजक शकील हिंदुस्तानी, सहसंयोजक जुबेर शेख, युवा संयोजक शादाब खान, नागपूर महानगर महिला संयोजक सारिका कुरेशी, सहसंयोजक फराह वसीम, सहसंयोजक सना खान, पुणे महानगर संयोजक जावेद शेख, महिला संयोजक फौजिया रोकडे, युवा संयोजक जफर अन्सारी, तर पश्चिम क्षेत्र संयोजक डॉ. जावेद अंसारी, सहसंयोजक हनीफ पठाण, सहसंयोजक इमरान शेख, महिला संयोजक नाहीद खान, पर्यावरण प्रकल्प संयोजक सादिक इनामदार
हिंदुस्तानी फर्स्ट हिंदुस्तानी बेस्ट संयोजक तहसील पटेल यांची नियुक्ती देण्यात आली.

याप्रसंगी जगतगुरू सुर्याचार्य कृष्णदेवनंद गिरीजी महाराज द्वारका, मुस्लिम राष्ट्रीय मंच मार्गदर्शक इंद्रेश कुमार, राष्ट्रीय संयोजक इरफानअली पिरजादे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे