21 जून नंतर 18 + नागरिकांना मोफत लस – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
नवी दिल्ली. (प्रतिनिधी) – 21 जून नंतर 18 + नागरिकांना मोफत लस दिली जाईल असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, केंद्र सरकार लस खरेदी करुन ती राज्यांना मोफत पुरवली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. याशिवाय पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेनुसार 80 कोटी नागरिकांना दिवाळीपर्यंत मोफत राशन पुरवणार असल्यांच मोदींनी नमूद केले. ज्या लोकांना खासगी रुग्णालयात लस घ्यायची आहे, त्यांना पैसे देऊन लस घेता येईल. मात्र खासगी रुग्णालये 150 रुपये अतिरिक्त चार्ज लावूनच लस देऊ शकतात. या किमतीवर नियंत्रण राज्य सरकारांनी ठेवावे, असे मोदी म्हणाले. आता जी जबाबदारी राज्यांना दिली होती, ती 25 टक्के जबाबादारी केंद्र स्वीकारेल, येत्या दोन आठवड्यात ते लागू केले जाईल. त्याबाबत नवी नियमावली तयार केली जाईल. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस देणार असून लसनिर्मिती कंनप्यांकडून एकूण उत्पन्नाच्या 75 टक्के लसी भारत सरकार खरेदी करुन, राज्य सरकारांना मोफत देणार आहे. आतापर्यंत देशातील अनेक नागरिकांना मोफत लस मिळाली आहे. आता 18 वर्षावरील लोकांनाही मोफत लस मिळेल.
भारतात सर्वांना मोफत लस दिली जाईल. ज्यांना मोफत लस नको असेल, खासगी रुग्णालयात जाऊन लस घेणार असतील, त्यांना 25 टक्के लसी उपलब्ध असतील. लसीच्या एकूण किमतीच्या 150 रुपये जास्त सर्व्हिस चार्ज घेऊन खासगी लस घेऊ शकता. मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लावावा लागला, त्यावेळी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार 8 महिने मोफत राशन पुरवले. यावर्षीही दुसऱ्या लाटेमुळे मे आणि जूनपर्यंत ही योजना राबवण्यात आली. ही योजना आता दीपावलीपर्यंत लागू असेल. महामारीच्याकाळात सरकार गरिबांसाठी त्यांचा साथी बनून उभे आहे. नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळेल.