डिजिटल मिडीया द्वारे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्याचे हक्क वाचवा – माजी आय पी एस के. प्रसाद
# डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र चे उद्घाटन
मुंबई. (प्रतिनिधी) – डिजिटल मिडीया द्वारे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्याचे हक्क वाचवा अशी प्रतिक्रिया माजी आय.पी. एस. अधिकारी के. प्रसाद यांनी डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र च्या उद्घाटन कार्यक्रमात दिली आहे.
यावेळी के. प्रसाद म्हणाले की, आज संपूर्ण जग इंटरनेटशी जोडले गेले आहे. त्यात आपण डिजिटल इंडिया, डिजिटल महाराष्ट्र कडे वळत आहोत. असे होत असताना पत्रकारिता सुद्धा डिजिटल होत चालली आहे. जे स्वतंत्र माध्यमांना आहे ते स्वतंत्र डिजिटल मिडीया सुद्धा असले पाहिजे. आणि ते आबाधित राहिले पाहिजे. तसेच ते टिकवण्याचे आव्हान डिजिटल मिडीया असे माजी आय. पी. एस. अधिकारी के. प्रसाद यांनी व्यक्त केले. बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, डिजिटल मिडीयाद्वारे तळागाळातील लोकांपर्यंत बातमी पोहचत आहे. डिजिटल मिडीया द्वारे एखादी बातमी क्षणार्धात वायरल होते. अशा वेळी डिजिटल मिडीया ची जवाबदारी वाढते. यावर आपल्या सर्वांनी खात्रीपूर्वक काम करावे. अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने म्हणाले की, एका सर्वेक्षणा नुसार डिजिटल मीडिया मोठ्या प्रमाणावर वृत्त वाचकांपर्यंत जात आहे. अश्यात ग्रामीण भागात सुद्धा डिजिटल मिडीया पत्रकार यांची संख्या व त्यांच्या समस्या वाढत आहे. त्यांना वाली कोणीच नव्हते. त्या अनुषंगाने आम्ही ” डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र ” स्थापन केले असून या द्वारे डिजिटल मीडिया पत्रकारांना कोणत्याही समस्येला सामोरे जाऊ लावू नये म्हणून आमचा प्रयत्न राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.
या प्रसंगी नाट्य सिने दिग्दर्शक विजू माने, अभिनेता अभिजित चव्हाण, बाजीराव मस्तानी फेम अंगद म्हास्कर, उप मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव अविनाश सोलवट, डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र उपाध्यक्ष पत्रकार तुळशीदास भोईटे, यांच्या सह अनेक दिग्ज नेते, अधिकारी, सिने अभिनेते, पत्रकार मंडळी उपस्थित होती.