…आता एस. टी. कामगारांची सुनावणी न्यायमूर्ती प्रसन्न वरळ यांच्या कडे होणार – ॲड. गुणरत्न सदावर्ते
मुंबई. (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा विषय मा. न्यायमूर्ती कथावाला यांच्याकडून सुनावणी करिता मा. न्यायमूर्ती प्रसन्न वरळ यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहे अशी माहिती ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.
यावेळी ॲड. सदावर्ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवून आता पर्यंत एकूण 35 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ही अतिशय खेदजनक बाब आहे. या ढिसाळ कारभाराच्या विरोधात तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा महाराष्ट्र शासन मध्ये विलीनीकरण व्हावे म्हणून एस. टी. महामंडळातील कर्मचारी एकत्र येऊन मुंबई येथील आझाद मैदान येथे गेल्या काही दिवसापासून आंदोलन करत आहेत. परंतु, लोकशाही मार्गाने चालल्या या आंदोलनास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आंदोलनात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस देणे, बडतर्फ करणे, निलंबित करणे अशा कार्यवाहीची तगादा लावल्याने त्यावर नाराजी व्यक्त करत एस. टी. महामंडळातील वरिष्ठ अधिकऱ्यांचा कामगारांना पाठींब्याचे सत्र सुरू असून नांदेड च्या विभागीय नियंत्रक काळे यांनी आपला राजीनामा दिला. तर दुसरी कडे कंदार यांना कामगारांवर पोलीस कार्यवाही करा असे आदेश असल्याने त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली म्हणून त्यांची गडचिरोली येथे तडकाफडकी बदली करण्यात आली. त्याचबरोबर पंढरपूर मध्ये आधिकऱ्यांमध्ये धुसफूस सुरू असून संप करी लोकांशी चर्चा झाली आहे, अशी माहिती ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते दिली आहे.