महाराष्ट्र
महाराष्ट्र विधिमंडळाचे पुढील अधिवेशन नागपुरात ? ; वि.प.ने. फडणवीस यांच्या प्रश्नावर पवारांचे उत्तर
मुंबई. ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गेली 02 वर्षे नागपुरात झालेले नाही त्यामुळे पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याचा विचार असल्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरराच्या तासात सांगितले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चा प्रश्न उपस्थित केला होता.
नागपूरच्या अधिवेशनात अधिकारी आणि कर्मचारी यांना मिळणाऱ्या भत्यातील वाढीबाबत योग्य विचार केला जाईल असे आश्वासनही त्यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिले. त्याचबरोबर नागपूर अधिवेशनासाठी उपस्थितीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणारा 100 टक्के भत्ता न देण्याबाबतचा निर्णय झाल्याबाबत आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रश्न उपस्थित केला असता त्यावर असा निर्णय झाल्याचे सांगत अधिकारी – कर्मचाऱ्यांची सोय राज्य सरकारकडून करण्यात येत असल्यास 100 टक्के भत्ता दैनिक भत्ता न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अजित पवार यांनी लेखी उत्तरात सांगितले. यापूर्वीही मागील आठवड्यात अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशन घेण्याबाबतची विचारणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभेत केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना विचारार्थ सुचना असे उत्तर दिले होते. त्यानंतर याविषयीचा मुद्दा फडणवीस यांनी पुन्हा उपस्थित केला.