महाराष्ट्रराजकीय

गोपीचंद पडळकर आपण, फडणवीस यांचा खिशातील रुमाल आहात घरातील पायपुसणी बनू नका – सचिन खरात

मुंबई. ( प्रतिनिधी ) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याविषयी बोलताना तोंड आवरा असे म्हणत भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या खिशातील रुमाल आहात आता घरातील पायपुसणी बनू नका असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी व्हिडीओ द्वारे घेतला आहे.

यावेळी रिपाई खरात म्हणाले की, पडळकर आपण शरद पवार यांच्यावर पावसात भाषण केल्याची टिंगल टवाळी करता परंतु ध्यानात ठेवा आपण 80 वर्षाचे व्हाल तेव्हा आपणाला स्टेज वर झोपून भाषण करण्याची वेळ येईल. गोपीचंद पडळकर 105 आमदार येऊन तुम्हाला सत्ता मिळाली नाही म्हणून तुमच्या पोटात मुरडा आला आहे परंतु, तुमचं गणित फार कच्च आहे मणिपूर, गोव्यात, मध्यप्रदेश, कर्नाटक येथे बहुमत नसतानाही सत्ता मिळवली त्याचा हिशोब भारताच्या जनतेला द्यावे लागेल. आपण देवेंद्र फडणवीस यांच्या खिशातील रुमाल आहात परंतु फडणवीस यांच्या घरातील पाय पुसणी बनू नका असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्ष करत असून यापुढे आदरणीय शरद पवार साहेब यांच्याविषयी बोलताना तोंड आवरा असे खरात यांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे