ब्रेकिंगमहाराष्ट्र
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट.
मुंबई. ( प्रतिनिधी ) – महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली व विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याबाबत निवेदन दिले. या शिष्टमंडळातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, गृहराज्यमंत्री सतेज पाटील आदी उपस्थित होते.