सर्वसामांन्यांच्या विविध प्रश्नासांठी 14 मार्चच्या मोर्च्यात सामील व्हा. – शेकाप डॉ. बाबासाहेब देशमुख
सांगोला. (प्रतिनिधी) – सध्या शेतकरी कष्ठकरी, व्यवसाईक व सामांन्य नागरीक पुर्णता आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. त्या आर्थिक अडचणीला निसर्गाचा लहरीपणा बर्यापैकी कारणीभुत आहे. अवेळी पाऊस, कधी भरपुर पाऊस तर कधी दुष्काळ अशा नैसर्गिक संकटाशी मुकाबला करीत शेतकरी आपला शेती व्यवसाय संभाळत आहेत. आशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या शेतात जे काही ऊत्पादन निघत आहे त्या शेती मालालाही सरकार योग्य असा भाव देत नाही ऊत्पादन खर्चापेक्षा किती तरी उत्पन्न कमी प्रमाण निघत असले मुळे दोंन्ही बाजुने आमचा शेतकरी अडचणीत सापडलेला आहे.
लॉकडाऊन काळात लहान मोठ्या व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प झाले त्यामुळे ते व्यावसायिकांची प्रगती ह्या दोन वर्षाच्या संकटामुळे कित्येक वर्षे मागे गेली आहे.
शेतीवरती व लहानमोठ्या व्यवसायावरती मोठ्याप्रमाणात अवलंबून असणारे मजुर, कामगार, ह्यांना तर आपले कुटुंब चालवणे जिकीरीचे होऊन बसले आहे अशा कठीण परिस्थितीमध्ये अडचणीत असलेले शेतकरी, व्यवसायीक, कामगार यांना सरकारने काही ना काही आर्थिक मदत करायला पाहीजे ती मदत करणे सरकारची जबाबदारी आहे परंतु मदत करणे तर सोडाच उलटपक्षी सामांन्य जनतेला वसुलीच्या नावाने जो तगादा लावला जातोय तो मात्र निंदनीय आहे.
एकतर कुठली मदत नाही, पिकांचे, बागांचे आतोनात नुकसान झाले आहे. बि बीयाणे, खते व औषधासाठी काढलेली कर्जे ह्याचा बोजा संभाळता संभाळता नाकीनऊ आलेत वरुन विज बिलाच्या वसुलीसाठी वसुली पथके दारात व थकीत बिलाच्या वसुलीचे कारण दाखवत विजतोडण्याचे प्रकार हा प्रकार अक्षरशः सामांन्याच्या जिवाशी आला आहे. विज बिलाच्या तगाद्याने पंढरपुर तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. खरतर शेतकऱ्यांनेही आत्महत्येसारखे प्रकार आजिबात करु नयेत आपल्या व्यथा ठामपणे मांडण्यासाठी लोकशाही मार्गाने सरकारसमोर आंदोलनाच्या माध्यमातुन आपल्या व्यथा सरकारी दरबारी पोहचवाव्यात त्यासाठी सोमवार दि. 14/03/2022 रोजी सांगोले तहसील कचेरीवरती शेतकरी कामगार पक्षाने मोर्चा आयोजीत केलेला आहे त्यामध्ये हजारोच्या संख्येने सामील व्हावे आसे आवाहन पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केले.