मुंबई. (प्रतिनिधी) – कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी नियम पाळा असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
यावेळी टोपे म्हणाले की, आपण सोशल डिस्टंसिंग ठेवून व्यवस्थित काळजी घेतली तर तिसरी लाट येणार नाही. तिसऱ्या लाटेचा फटका बसू नये म्हणून प्रत्येक जिल्ह्यात पेडियाट्रिकचे वार्ड तयार करणे,पेडियाट्रिकचे टास्क फोर्स तयार करणे ही प्रक्रिया सध्या राज्यात पूर्ण करण्याचे काम सुरु आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जालना जिल्हा परिषद कार्यालयात शिवस्वराज्य दिनानिमित्त भगवा ध्वज फडकवण्यात येऊन ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
# लसीकरण अखंडित व्हावे म्हणून प्रयत्न
लसीकरण केंद्राच्या नियमानुसार होत आहे. त्यामुळे राज्याला लसीकरणाचा तुटवडा असला तरी अधिकाधिक लस आयात करणेचे प्रयत्न सुरू आहेत.