परिचारिकांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा – अनिल गलगली
# केईएम नर्सेस वेलफेयर सोसायटीचे वार्षिक स्नेह संमेलन
मुंबई. ( प्रतिनिधी ) – आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी परिचारिका समुदायाचे सार्वजनिक आभार मानत प्रतिपादन केले की कोरोना काळात डॉक्टरांच्या बरोबरीने परिचारिका यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरी बजावली आणि त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. अश्या परिचारिका यांना सर्व स्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
केईएम नर्सेस वेलफेयर सोसायटी २०२२ च्या कार्यकारिणीने केईएम परिचारिका इमारत परिसरात वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन केले होते. प्रमुख पाहुणे म्हणून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना निमंत्रित करण्यात आले होते. परिचारिकेच्या कार्याबद्दल त्यांनी आदर व्यक्त करत भविष्यात त्यांना येणा-या अडचणी या प्रशासनापर्यंत पोहचवून सकारात्मक निराकरण करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. रूग्ण मित्र विनोद साडविलकर यांनी केईएमच्या परिचारिकेच्या सहकार्याने गरीब गरजू रुग्णांना मदत होत असल्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली. वार्षिक स्नेहसंमेलनास मेट्रन प्रतिमा नाईक, सिस्टर इंचार्ज मेघना गांगुर्डे, असिस्टंट मेट्रन लता कांबळे, सिस्टर इन्चार्ज रिध्दी राणे, वाॅर्ड असिस्टंट रविंद्र वरखडे, सिस्टर ट्यूटर ज्योत्सना जाधव, सिस्टर इन्चार्ज श्वेता परब, निलीमा शिंदे, स्टाफ नर्स श्रुती गमरे, सायली माने, स्नेहा पाटील, प्रज्ञा देसक व सहकारी परिचारिका उपस्थित होते. मेट्रन प्रतिमा नाईक यांनी अनिल गलगली व विनोद साडविलकर यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला. याप्रसंगी सर्व परिचारिकांनी नृत्य, गाणी अन्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुरेख आयोजन केले.