लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या प्रथम सभेत कामकाज चर्चा व मान्यवरांचे सत्कार !
# पत्रकार व कोरोना बळींना श्रध्दांजली
अकोला. (प्रतिनिधी) – लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाची स्थापनेनंतरची पहिला सभा संघटनेच्या तापडीया नगरमधील कार्यालयात संपन्न झाली.
स्थापनेनंतर शुभारंभाचा दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्याचा पदाधिकाऱ्यांचा संकल्प होता. परंतू कोरोना संसर्ग अधिक वाढल्याने ते शक्य झाले नाही.त्यामुळे प्रथम सभा संस्थापकीय अध्यक्ष संजय देशमुख यांचे अध्यक्षतेखाली व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झुमव्दारे घेण्यात आली.मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, अकोला आणि ठीकठीकाणचे केंद्रीय कार्यकारिणी पदाधिकारी या सभेत सहभागी झाले होते. यामध्ये कार्य, रचना, उद्देश, संघटन व आगामी उपक्रमाबाबत चर्चा होऊन महत्वाचे ठराव पारित करण्यात आले. संघटनेच्या स्थापना प्रक्रियेपासून तर आतापर्यंत विविध सन्मान आणि शासकीय समिती व अन्य ठीकाणी बहूमान प्राप्त पदाधिऱ्यांचा सत्कार करण्यात आले. यात शासनाच्या साहित्त्य व संस्कृती समितीचे सदस्य पुष्पराजजी गावंडे, कादंबरीकार,(अकोला), अकोला बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश जाधव, प्रा. डॉ. संतोष हूशे, डी. डी. सी. न्युज चॅनेलच्या विदर्भातील अग्रेसर वृत्त निवेदिका सौ. जया भारती, व पत्रकार पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ, ग्रामगीता व नियुक्ती आणि अभिनंदन पत्रे देऊन प्रत्यक्ष सत्कार करण्यात आले. तर संघटनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब आंबेकर,(सातारा) यांची महाराष्ट्र नामदेव शिंपी समाजाच्या अध्यक्षपदी, डी. वाय. पाटील विद्यापीठ कोल्हापूर, मुंबईचे विश्वस्त सुर्यकांत तोडकर यांची पश्चिम महाराष्ट्रातील एका देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून, तर मनिभाई देसाई प्रतिष्ठाणाचे व अनेक संस्थांचे संस्थापक, अध्यक्ष प्रबोधनकार, ह.भ.प. डॉ. रविंद्र भोळे यांना यापूर्वीचे व सध्या नायजेरियाचा विदेशी अवार्ड मिळाल्याबद्दल त्यांचा ऑनलाईन सत्कार जाहिर करून शाब्दीक मानपत्र देण्यात आले. तसेच फिल्म सेन्सार बोर्डाच्या व नाट्य टी.व्ही. कलावंत अंजली वळसंगकर व इतर पदाधिकाऱ्यांचेही पत्रकार महासंघातील सहभागाबद्दल सन्मान आणि अभिनंदन करण्यात आले. सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, ओळख व अभिनंदनपत्रे सोबत पाठविण्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या सभेत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात येऊन एक पुरस्कार परिक्षण व वितरण समिती स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. प्रसंगी अर्थ नियोजन सभासद वाढवून संघटनेची व्याप्ती वाढविणे यासह कायदेविषयक सल्लागार म्हणून ॲड. नितीनजी धुत यांची नियुक्तीला मंजुरात देण्यात आली. या सभेला सत्कार मुर्ती तसेच मार्गदर्शक, सल्ला. सदस्य, माजी ज्युडी. मॅजिस्ट्रेट ॲड. नितीन अग्रवाल, सहसचिव डॉ. अनुपकुमार राठी, केंद्रीय सचिव राजेंद्र देशमुख, कोषाध्यक्ष किशोर मानकर, ऑनलाईन मध्ये केंद्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आंबेकर (सातारा) कार्यकारिणी सदस्य अंबादास तल्हार, सुर्यकांत तोडकर (कोल्हापूर) जेष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे (पूणे) व इतर पदाधिकारी उपस्थित होते.