रत्नागिरीत विमाना पेक्षा रुग्णवाहिका माहागल्या..!
# आर.टी.ओ.ने ठरवून दिलेल्या दरपत्रकाला केराची टोपली
रत्नागिरी. (रमजान गोलंदाज) – रत्नागिरीत कोविल्डमध्ये मोठ्या प्रमाणात लूट सुरु आसताना त्यात रुग्णावाहीका चालकांनी ही आपला वाटा सोडला नाही. रत्नागिरीमध्ये विमानापेक्षा रुग्णवाहीका महागल्या असल्याने रुग्णासहित नातेवाईकांचे ही हाल झाले आहेत.
सध्या 1/2 किलोमीटर ला रुग्णवाहिका मालक चालकांकडून 2 ते 3 हजार रुपये घेऊन रुग्णांची पिलवणूक केली जात आहे. रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात लूट सुरु असून जिल्हा रुग्णालयातुन रत्नागिरीच्या नगरपरिषद सम्शानभूमी पर्यत किंवा कब्रास्थान पर्यत जाण्यासाठी चक्क 2 ते 3 हजार रुपये घेते जात आहे. या रुग्णावाहीका वाल्यांची संघटना असून सगळ्यांनी एकच दर ठरवला आहे. कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांना कोणतेच वाहन नेत नसल्याने या रुग्णवाहिका वाल्याची चांगलीच चांदी झाली. शासनाच्या रुग्णवाहिका आहेत मात्र त्या वरातील मागून घोडे अशी परिस्थिती झाली आहे.आर. टी. ओ. कार्यालयाकडून या रुग्णवाहिका वाल्यांना दरपत्रक ठरवून दिले आहेत मात्र त्या दर पत्रका प्रमाणे दर आकारले जात नसून त्यांच्या पत्रकाला केराची टोपली दाखवली जात आहे. या लूट करणाऱ्या रुग्ण वाहिकेचे परवाने रद्द करून गाड्या सहित मालकांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
या संदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता दि. 25 /06/20 रोजी प्रादेशिक परिवहन प्राधिकरण रत्नागिरी यांच्या बैठकीत खालील दराला मान्यता देण्यात आली 25 कि.मी. अथवा 2तासाकरिता तसेच प्रति किलोमीटर भाडेदर ठरवण्यात आले.त्यामध्ये मारुती कार ला 700/- (14 रू. पर कि. मी.), टाटा सुमो 840/- (14 रू. पर कि. मी.),टाटा 407- 980रुपये (20 रू. पर कि. मी.),आयसियू आणि वातानुकूलीत वाहने 1190/ -रुपये (24 रू. पर कि. मी.), असेल दर निश्चित करण्यात आले आहेत. मात्र या दाराच्या 5 ते 10 पटीने रक्कम आकारली जात आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे लवकरात लवकर लेखी तक्रारी करण्यात येणार असून यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे.