शंकर नारायण महाविद्यालयातील ‘मॉक पार्लमेंट’ मध्ये विद्यार्थ्यात दिसला राजकारण बद्दल सकारात्मक दृष्टिकोन
भाईंदर. ( प्रतिनिधी ) – गेल्या काही दिवसात घडलेल्या महाराष्ट्रातील सत्तानाट्या मुळे अनेकांनी राजकीय घडामोडीत रस घेतला. राष्ट्रपती निवडणूक, ससंदेचे चालू अधिवेशन या मुळे सध्या राजकीय चर्चांचे फड रंगताना दिसतात. असे असले तरी एकंदर राजकारण बद्दल सर्व सामान्यांच्या मनात समिश्र भावना आहेत. पक्षांतर, सभागहृातील गोंधळ, भ्रष्टाचार यामुळे राजकारणाच्या नकारात्मक छटा अधिक ठळकपणे उठून दिसतात. मात्र याच राजकारणाचे आशादायी चित्र आज येथील विद्यार्थ्यां च्या अभिरूप ससंदेत दिसले. येथील शंकर नारायण महाविद्यालयाच्या अंतर्गत मूल्यमापन समिती आणि इतिहास विभाग संयुक्तपणें आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या उस्फुर्त प्रतिसादातनू हे चित्र साकारले गेले. सह शिक्षक निमेश पाटील, इतिहास विभाग प्रमखु प्रा. सुनिल धापसे आणि अंतर्गत मूल्यमापन समितीच्या समन्वयक डॉ. सत्याश्री यांच्या टीम ने या उपक्रमाच्या आयोजनाचे कार्य पार पडले.

कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. सध्या गाजत असलेली अनेक मुद्द्यांची निवड चर्चेसाठी करण्यात आली होती. अग्निपथ योजना, कृषी संबंधी मुद्दे, पर्यावरणीय मुद्दे, सध्या सरकारचे परराष्ट्र विषयक धोरण, कोरोना महामारीचे नियत्रंण, सध्याचे सांप्रदायिक तणावाचे वातावरण या पैकी मुद्देंची निवड करून विद्यार्थ्यानी सखोल तयारी केली. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यापैकी स्वेच्छेने निवड करत विद्यार्थ्यांनी या ससंदेत आपले मुद्दे आणि विचार मांडले. आपले राष्ट्रीय शक्षैणिक धोरण रचनावादाचा पुरस्कार करते, ज्यात विद्यार्थ्यांनी ज्ञानप्राप्तीच्या प्रक्रियेत स्वतः सक्रिय सहभाग घेणे अपेक्षित असते. शिक्षकांची भूमिका हि विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत मदत करण्याची असते. अभिरूप ससंदेसारखे उपक्रम याच दृष्टिकोनातनू आयोजित केले जात असल्याचे म्हणणे राज्यशास्त्राचे सह शिक्षक निमेश पाटील यांनी मांडले. उच्च माध्यमिक परीक्षेत कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम आलेल्या कुमारी पूजा देबनाथ या विद्यार्थी नेने या ससंदेच्या लोकसभाध्यक्षांची भुमिका पार पडली. विरोधीपक्ष नेता झालेल्या प्रियल शुक्ला या विद्यार्थिनीने अग्निपथ सह अनेक मुद्द्यावर घणाघाती टीका करत चर्चेची सरुवात केली. अग्निपथ योजनेवर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी हिरहिरीने मते मांडली. या सरकारच्या कार्यकाळात भारताचा प्रभाव जगभरात किती वाढला आहे, याचे वर्णन सत्ताधार्यांनी केले. तर भूतान सोडून एकही शेजाऱ्या बरोबर आपले सबंधं कसे बिघडलेले आहेत हे विरोधी सदस्यांनी अधोरेखित केले. कोरोना कालखंडातील त्रास एका बाजूला तर रेकॉर्ड वक्सिनाशन एका बाजूला, अशी दोन्ही बाजनू चर्चा झाली. सांप्रदायिक सौहार्द कसे बिघडलेले आहे याचा पाढा विपक्षी सदस्यांनी वाचला, यात एका पक्ष प्रवक्त्याच्या धार्मिक टीकाटिप्पणी वरून झालेल्या विवादावर सुध्दा संवेदनशीलपणे चर्चा झाली. शेतकऱ्यांचे प्रश्न, पर्यावरण याची चिंता सदस्यांच्या मुद्द्यातून प्रगत झाली. या सर्व चर्चेला उत्तर देण्याचेकाम पतंप्रधान काव्या वैद्य ह्या विद्यार्थिनीने केले. या सरकारची उल्लेखनीय कार्य सांगताना पतंप्रधानांनी विरोधी पक्ष सदस्यांना चिमटे हि घेतले. राष्ट्रगीत गायनाने ससंद सत्राचा समारोप झाला.
शंकर नारायण एजुकेशन ट्रस्ट चे अध्यक्ष रोहिदास पाटील, सचिव महेश म्हात्रे तसेच प्राचार्य डॉ. विष्णू यादव यांनी या उपक्रमाचे कौतकु केले. या वर्षी महाविद्यालय राष्ट्रीय मूल्यांकनाला सामोरे जात आहे. या सारखे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांच्या विकासा साठी राबवले जातील असे त्यांनी आस्वस्थ केले. भावी राजकारण्यांना प्रशिक्षित करण्यात या सारख्या उपक्रमाचे योगदान महत्वाचे ठरेल.