आपला जिल्हा

पूरस्थिती संकटाविरुद्ध रा. स्व. संघाच्या स्वयंसेवक दक्ष !

खेड. (प्रतिनिधी) पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई व कोकणात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी आपत्ती निवारण हेतू सेवाकार्य आरंभिले आहे.

खेड येथील रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी १०० आपत्तीग्रस्त कुटुंबांना दोन वेळचे जेवण, ३०० रेल्वे प्रवाश्यांना अल्पाहार दिले. चिपळूण येथे दुपारी २ हजार फूड पॅकेट्स तर रात्रीसाठी ५५०० फूड पॅकेट्स ची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच हेल्पलाईन म्हणून आज १५०० समाज बांधवांशी संपर्क झाला. चिपळूण येथील परिस्थिती हाताळण्यासाठी जवळपास २०० स्वयंसेवक कार्यरत झाले आहेत. डेरवण येथे २ हजार लोकांच्या जेवणाची प्राथमिक व्यवस्था असून परिस्थितीनुसार त्यात वाढ करण्याचीही सिद्धता झाली आहे. रेस्क्यू ऑपरेशन साठी काही बोटी आणल्या गेल्या आहेत व लवकरच रेस्क्यू ऑपरेशन सुरू होणार आहे. रेस्क्यू ऑपरेशन नंतर राहण्यासाठी व्यवस्था तसेच भोजन, अल्पहार, पाणी व प्रथमोपचार ई. व्यवस्था करण्यात आल्या आहेत. परिस्थितीचा अंदाज घेऊन स्वयंसेवक मदतकार्य राबवित आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे