अलिबाग संघ कार्यकर्ते मदत घेऊन महाडला
महाड / अलिबाग. (प्रतिनिधी) – अलिबाग तालुका, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती आणि विश्व हिंदू परिषद, यांच्यातर्फे केल्या गेलेल्या आवाहनाला अर्ध्या दिवसातच अलिबागकारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, त्यामुळेच 3 टेम्पो भरून पाणी बाटल्या, फ्लोअर क्लिनर, सुके खाद्यपदार्थ, टॉवेल, बेडशीट, चादरी, क्लोरोवॅट, किराणा सामान इत्यादी तातडीने गरजेच्या असलेल्या वस्तू संघाचे सध्याचे मदतसामुग्री साठा करणारे केंद्र, बुटाला हाऊस, महाड येथे पोहोच होऊ शकल्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून मदतीचं आवाहन केलं जातं, तेव्हा आपले दातृत्व योग्य ठिकाणीच वापरले जाणार या १०० टक्के विश्वासाने लोक साहाय्य देतात, हा विश्वास गेल्या ९६ वर्षात संघाने आपल्या कार्यपद्धतीने निर्माण केला आहे. अलिबाग तालुक्यातून फक्त सामुग्रीच नाही तर तिथे आलेला गाळ, चिखल स्वच्छतेसाठी 18 स्वयंसेवकांची टीम सुद्धा फावडे, घमेले, वायपर्स, झाडूसहित रवाना झाली आहे. तिथे प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी व्हायला गेलेले; विनय वाडकर, पियुष सुतार, वैष्णव पाटील, सुनील म्हात्रे, अमोघ कोल्हटकर, वेदांग मराठे, पारस जैन, जयेश म्हात्रे, केतन गोरीवले, गीतेश मांगेला, प्रल्हाद घरत, शार्दूल लिमये, आदित्य दातार, श्रेयस वैशंपायन, चेतन परांजपे, ओम अंबाजी, यशोधन जोगळेकर आणि स्वयम् राऊळ या स्वयंसेवकांचे आणि तिथे सामान पोहोच करून, ते उतरवायला मदत करायला गेलेले रोहित वैशंपायन, चिन्मय तळेकर, ऋषिकेश जोशी आणि अथर्व दातार यांचेसुद्धा विशेष कौतुक. अशाच टीम आणि मदतसामुग्री, पेण, खालापूर, पनवेल इतर तालुक्यांतून सुद्धा रवाना होत आहेत. या कार्यात हातभार लावणाऱ्या सर्व सज्जनशक्तीचे शतशः आभार करण्यात येत आहे.