आपला जिल्हा

माणगांवची तरुणाई धावली महाडकरांच्या मदतीला, माणुसकीच माणसाच्या कामी येताहे

माणगांव. (प्रतिनिधी) महाडच्या महापूराने महाभयंकर नुकसान झाले आहे जवळपास सर्वच महाडकरांचे घरात कपडे अन्नधान्य जीवनावश्यक सर्वच अनपेक्षितपणे हिरावले आहे. आपली कोकणी माणस स्वाभिमानी आहेत, कितीही नुकसान झाले तरी चेहऱ्यावर जराही हतबलता दाखविणार नाही पण यावेळची परिस्थिती भयानक आहे. प्यायला पाणी नाही, घरादाराचा चिखल झालाय काल पर्यंत सगळ होत आणि आज अंगावरचे कपडे सोडले तर काहीच उरल नाही, प्रसंग मोठा कठीण आहे. बर काही जणांकडे पैसे आहेत पण बाजारात वस्तुच मिळणार नाही सारा चिखल आहे. केवळ जीव वाचला एवढ काही ते मानसिक समाधान. पुढे किती दिवसात लाईट, पाणी मिळेल याची खात्री नाही सर्व अंधार आहे. अशा परिस्थितीत माणगांवकर तरुणाई धावुन आली आहे. जे जे आणि जस जस शक्य होईल तशी मदत करण्यासाठी महाडकरांना आधार देण्यासाठी देहभान विसरुन सरसावले आहेत. निसर्गचक्री, तौक्ते वादळांत आम्ही माणगांवकरांनी हे सार सोसलयं, सर्व उध्वस्त व्यवस्था पुन्हा रुळावर यायला व घरातील लाईट यायला पंधरा दिवस गेले होते. प्यायचे पाणी तर चारदिवसा नंतर सुरु झाले तो अनुभव गाठीशी आहे. अशा प्रसंगी माणुसकीच माणसाचे कामी येते ! आज नेमक्या याच भावनेतून माणगांवचे हे तरुण मदतीला सरसावले आहेत. त्यांच्या याच स्वयंस्फूर्त मदतीची गरज आहे. सर्वांनी आपला खारीचा वाटा उचलुन महाडकरांचे दुःख हलक करण्याचा प्रयत्न करुयात असा निश्चय करुन हे तरुण गेले दोन दिवसांपासून अहोरात्र मदतकार्य करीत आहेत. याचा आदर्श इतरांनीही घेऊन आलेले संकट थोपवून नव्याने पुन्हा एकदा फिनिक्स भरारी घेण्यासाठी तयार होऊयात ! महाडकरांनी चिंता करु नये, आपल्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. असे प्रातिनिधीकपर आवाहन निलेश थोरे आणि मित्रमंडळ, जाणताराजा, ब्राम्हण सभा सेवा, प्रभाग सहा, खांदाड, सिध्दीनगर माणगांव मधिल जवळपास सर्वच प्रभागातील तरुणाई मित्रमंडळातर्फे करण्यात येत आहे. तसेच शासनाचे पोलीस, महसुल, शिक्षक दानशूर व्यक्तीमत्व तसेच आणखी काही सामाजिक गृप पॉस्को कंपनी व्यवस्थापन मदती साठी सरसावले आहेत. पाणी बॉटल, नाश्ता, जेवण, मेणबत्ती, आगपेटी जीवनावश्यक सामान कपडे, अंथरुण-पांघरुन सर्व सामुग्री या मदती अंतर्भूत महाडकरांना उपलब्ध करुन देण्याचा त्यांचा कोणतीही प्रसिध्दीची अभिलाषा न ठेवता हा प्रामाणिक प्रयत्न अविरतपणे दिसून येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे