महाराष्ट्र अंनिसतर्फे ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
ठाणे. (प्रतिनिधी) – अवतीभवतीच्या अंधश्रद्धांचा उगम, प्रचार, प्रसार व परिणाम समजून त्यावर मात करण्याच्या उद्देशाने, समाजामध्ये प्रबोधन करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीच्या ठाणे व नवी मुंबई जिल्ह्याने संयुक्तपणे तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. पहिल्या दिवशी दि. 31 जुलै रोजी ‘वेळीच ओळखा बुवाबाजीचा विळखा’ या विषयावर प्रा. मच्छिद्रनाथ मुंडे यांनी मार्गदर्शन केले. आज दि. 1 ऑगस्ट रोजी ” अंनिस म्हणजे काय हो साथी ? ” या विषयावर परेश काठे मार्गदर्शन करणार आहेत. उद्या दि. 2 ऑगस्ट रोजी ” चला समजून घेऊ या अंनिसचे विविध उपक्रम ” या विषयावर निमा शिंगारे व अशोक निकम मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात सामील होण्यासाठी इच्छूकांनी राजेश देवरुखकर 9167568187 , किरण वाळुंज 8652277474 , अशोक निकम 9320228402 या मोबाईल नंबरवर संपर्क करून शिबिराच्या ऑनलाईन लिंकसाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.