देशभरातील विविध संघटनांनी “मुस्लीम महिला हक्क दिन” साजरा केला
# तिहेरी तलाक विरोधात कायदा आणल्याबद्दल मुस्लीम महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मानले आभार
नवी दिल्ली. (प्रतिनिधी) – महिला आणि बालविकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज नवी दिल्ली येथे “मुस्लीम महिला हक्क दिन” कार्यक्रमाला उपस्थिती लावली. तिहेरी तलाक पीडित मुस्लीम महिलांशीही मंत्र्यांनी संवाद साधला.
तिहेरी तलाक प्रथेविरोधात 1 ऑगस्ट 2019 रोजी कायदा आणून तिहेरी तलाक सामाजिक गैरकृत्य म्हणून फौजदारी गुन्हा ठरवल्याबद्दल मुस्लीम महिलांनी पंतप्रधानांचे आभार मानले. ते म्हणाले की, सरकारने देशातील मुस्लिम महिलांचे “स्वावलंबन, स्वाभिमान आणि आत्मविश्वास” बळकट केला आहे आणि तिहेरी तलाकविरोधात कायदा आणून त्यांच्या घटनात्मक, मूलभूत आणि लोकशाही अधिकारांचे संरक्षण केले आहे. यावेळी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या की,1 ऑगस्ट हा दिवस तिहेरी तलाक विरुद्ध मुस्लीम महिलांच्या संघर्षाला सलाम करण्याचा दिवस आहे. मुस्लीम महिलांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी अल्पसंख्यांक व्यवहार मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि कामगार मंत्रालय एकत्रितपणे काम करेल. यावेळी बोलताना मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, तिहेरी तलाकविरोधातील कायदा मुस्लीम महिलांचे घटनात्मक अधिकार सुनिश्चित करण्यासाठी “मोठी सुधारणा” असल्याचे सिद्ध झाले आहे, ज्याने “चांगले परिणाम” दर्शविले आहेत. कायदा लागू झाल्यानंतर देशभरात तिहेरी तलाकच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे, असे ते म्हणाले.