मनसे : उप शाखा अध्यक्ष पदी मोसिन शेख यांची नियुक्ती ; सर्वपक्षीय जोरदार खळबळ !
मुंबई. (प्रतिनिधी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशन्वये मानखुर्द – शिवाजीनगर विधानसभा विभागातील प्रभाग क्र. 147 च्या उप शाखा अध्यक्ष पदी मोसिन शेख यांची नियुक्ती झाल्याने राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे.

आगामी महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे असे चर्चिले जात आहे. पक्षाच्या शाखांचे मजबूतीकरण केले जात आहे. संघर्षामुळे बहुचर्चित ठरलेले मोसिन शेख हे अतिशय अभ्यासु व आक्रमक समाजसेवक असुन मनसे मधील ज्येष्ठ नेत्यांचे विश्वासु सहकारी मानले जातात. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना गोरगरीब नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्यासहित पक्ष वाढीसाठी मेहनत घेणार असल्याचे शेख यांनी सांगितले. तसेच तळागाळातील गोर गरीब कार्यकर्त्यांना सोबतीला घेऊन अनेक आंदोलने करणार असुन जनतेसाठी सदैव झटत राहणार आहे. शेख यांच्या नियुक्ती करून मनसे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उपविभाग अध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना उप चिटणीस संजय चव्हाण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मानखुर्द – शिवाजीनगर विधानसभा विभाग अध्यक्ष जगदीश खांडेकर, प्रभाग क्र. 147 प्रदीप जाधव (आबा वाटेगावकर), सुनील शिर्के आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.